देशभरात अधून मधून लव्ह जिहादच्या कहाण्या आणि बातम्या येतच असतात. हैदराबाद मधून आलेली लव्ह जिहादची कहाणी आणि उत्तर कहाणी वेगळी आहे. Hyderabadi story of Love Jihad; The Hindu played with the child’s soul
हैदराबाद मध्ये नागराजू नावाच्या मुलाने अशरिन सुलताना या कॉलेज मैत्रिणीशी लग्न केले. त्यांना पळून जाऊन लग्न करावे लागले. कारण अशरिन सुलतानाच्या भावाला हे लग्न मान्य नव्हते. नागराजूने लग्न करताना आपण मुस्लिम धर्म स्वीकारू, असे आश्वासन अशरिनच्या भावाला दिले होते. परंतु त्या भावाला ते लग्नच मंजूर नव्हते, असे अशरिन हिने नंतर हे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. नागराज आणि अशरिन यांनी पळून जाऊन लग्न केले.
Hyderabad | My brother was against my marriage. My husband told my brother earlier that he will become Muslim and will marry me. But my brother didn't approve: Ashrin Sulthana, deceased's wife — ANI (@ANI) May 6, 2022
Hyderabad | My brother was against my marriage. My husband told my brother earlier that he will become Muslim and will marry me. But my brother didn't approve: Ashrin Sulthana, deceased's wife
— ANI (@ANI) May 6, 2022
या लग्नानंतर खवळलेल्या अशरिनच्या भावाने हैदराबादच्या भररस्त्यात नागराजूची हत्या केली. या संदर्भात आता अशरिनच्या भावावर गुन्हा दाखल झाला आहे.
– कोणीही मदतीला आले नाही
पण खरी कहाणी या पलिकडची आहे. ती अशरिनने सांगितली आहे. आमच्यावरच्या हल्ल्याची ही घटना जेव्हा प्रत्यक्ष घडत होती, तेव्हा कोणीही आमच्या मदतीला आले नाही. आम्ही मोटरसायकलवरून जात होतो. त्यावेळी अचानक दोन तरुणांनी आम्हाला अडवले आणि हल्ला केला मला माहितीच नव्हते की हल्ला करणाऱ्यांमध्ये माझा भाऊ आहे. यानंतर जेव्हा समजले तेव्हा मला धक्का बसला, पण एवढे सगळे होताना आजूबाजूचे कोणीही आमच्या मदतीला आले नाही ,असे अशरिन हिने सांगितले.
– लव्ह जिहाद विरोधातील तोंडी मोहीम कृतीत नाही
कहाणीतला हा ट्विस्ट भयानक आहे. कारण लव्ह जिहादच्या विरोधात अनेक जण आवाज उठावतात. पण प्रत्यक्ष एखादी घटना घडते त्यावेळी कोणी मदतीला येत नाही, हीच बाब सुलताना तिने अधोरेखीत करून सांगितली आहे. हिंदू मुलाने आपल्या मुस्लिम मैत्रिणीशी विवाह केला. पण त्याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या वेळी आजूबाजूचा कोणताही समाज या नागराज आणि अशरिन या जोडप्याच्या मदतीला देखील आला नाही. हीच बाब पूर्णपणे खटकणारी आहे. नुसती लव्ह जिहाद विरोधात मोहीम चालवून काम भागणार नाही हेच हैदराबादच्या लव्ह जिहादच्या घटनेतून स्पष्ट होते आणि अशरिन सुलताना हिच्या मुखातून हे विदारक सत्य बाहेर आले आहे…!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App