आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत 400 ग्रॅम दूध 790 रुपयांना मिळत आहे. 1 किलो तांदूळही आता 500 श्रीलंकन रुपयांवर गेला आहे. उपासमार आणि महागाईपासून वाचण्यासाठी लंकेतील जनता भारताकडे वळत आहे. मंगळवारी सुमारे 16 श्रीलंकेचे नागरिक समुद्रमार्गे भारतात पोहोचले. त्यापैकी एक जोडपे चार महिन्यांच्या बाळाला घेऊन येथे आले आहे. Hunger crisis in Sri Lanka 16 Sri Lankans reach Tamil Nadu by sea, rice costs Rs 500 per kg in Sri Lanka
वृत्तसंस्था
चेन्नई : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत 400 ग्रॅम दूध 790 रुपयांना मिळत आहे. 1 किलो तांदूळही आता 500 श्रीलंकन रुपयांवर गेला आहे. उपासमार आणि महागाईपासून वाचण्यासाठी लंकेतील जनता भारताकडे वळत आहे. मंगळवारी सुमारे 16 श्रीलंकेचे नागरिक समुद्रमार्गे भारतात पोहोचले. त्यापैकी एक जोडपे चार महिन्यांच्या बाळाला घेऊन येथे आले आहे.
श्रीलंकेतील निर्वासितांनी सांगितले- आमच्या देशात तांदूळ 500 श्रीलंकन रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. 400 ग्रॅम दूध पावडर 790 रुपयांना मिळत आहे. एक किलो साखरेचा भाव 290 रुपयांवर गेला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे- हीच स्थिती राहिल्यास 1989च्या यादवी युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे स्थलांतर वाढण्याची शक्यता आहे.
अनियंत्रित महागाई आणि आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत लोकांना आपला देश सोडावा लागत आहे. हे लोक आपला देश सोडून भारतात येत आहेत. मंगळवारी 16 श्रीलंकन तमिळ नागरिकांनी आपला देश सोडला आणि भरपूर पैसे देऊन बोटीने तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोहोचले. या लोकांमध्ये चार महिन्यांच्या नवजात बालकाचाही समावेश आहे.
श्रीलंकेतील जाफना आणि तलाईमन्नार येथून दोन गटांत हे लोक तामिळनाडूत पोहोचले. पहिल्या गटात तीन मुलांसह सहा जणांचा समावेश होता. श्रीलंकेतील या लोकांमध्ये चार महिन्यांचा मुलगा असलेल्या जोडप्याचा समावेश आहे. हे सर्व लोक फायबर बोटीतून किनारपट्टीवर पोहोचले जेथे तटरक्षक दलाने त्यांची सुटका केली. दुसऱ्या गटात पाच मुले आणि तीन महिलांसह 10 जणांचा समावेश होता. 6 जणांच्या गटाने भारतातील अधिकाऱ्यांना सांगितले की, सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. बेरोजगारीही शिगेला पोहोचली आहे, म्हणून त्यांनी आपला देश सोडला.
प्राथमिक चौकशीत ते जाफना आणि तलाईमन्नार येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्यांची चौकशी करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व सहा श्रीलंकन तामिळ नागरिक रात्री दहाच्या सुमारास श्रीलंकेतून एका बोटीत बसले. सोमवारी मध्यरात्रीनंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडली. ज्या खलाशीने त्यांना आणले होते त्याने लोकांना एका छोट्या बेटावर सोडले आणि खोटे बोलले की रामेश्वरमहून कोणीतरी त्यांना घेण्यासाठी येईल.
जाफनाहून तामिळनाडूत आलेल्या रणजीत कुमार यांचा 24 वर्षीय मुलगा गजेंद्रन याने सांगितले की, त्यांनी बोटीच्या प्रवासासाठी 10 हजार रुपये दिले होते. हे पैसे त्याला नातेवाईकाने दिले होते. गजेंद्रन यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘मी जाफनामधील एक कामगार आहे. अलीकडेच मला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. माझ्याकडे एक छदामही उरला नाही. रामेश्वरममध्ये माझे काही नातेवाईक आहेत. म्हणून मी इथे यायचं ठरवलं.’
गजेंद्रन यांची पत्नी मेरी क्लेरिन्स (२३) यांनी सांगितले की, त्यांनी सोमवारी दुपारचे जेवण केले होते. त्या म्हणाल्या, ‘दुपारी चार वाजल्यापासून आम्ही किनाऱ्यावर बोटीची वाट पाहत होतो. माझा मुलगा निजथ चार महिन्यांचा आहे. सोमवारपासून आमच्याकडे खायला काही नव्हते.”
या ग्रुपमध्ये असलेल्या 28 वर्षीय देवरीने सांगितले की तिला दोन मुले आहेत – 9 वर्षांची एस्थर आणि 6 वर्षांचा मोशे. त्या म्हणाल्या, ‘श्रीलंकेतील परिस्थिती धोकादायक होती. कष्टकरी लोकांना खायला काहीच नाही. मला काम करायचे होते पण मी माझ्या दोन मुलांना एकटे सोडू शकत नाही. त्यामुळे माझे काही नातेवाईक असलेल्या भारतात यायचे ठरवले. बोटीने भारतात येण्यासाठी 10 हजार रुपये मोजावे लागल्याचे महिलेने सांगितले.
द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना, मन्नारमधील कार्यकर्ते व्ही.एस. शिवकरण यांनी इशारा दिला की ही निर्गमनाची सुरुवात आहे. “माझ्या ओळखीचे अनेक लोक श्रीलंकेतून पळून जाण्याचा विचार करत आहेत.” यातील काही लोकांचे नातेवाईक भारतातील निर्वासित छावण्यांमध्ये आहेत आणि काही ओळखीचे लोक तामिळनाडूमध्ये राहत आहेत. लोकांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावत आहे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App