विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :Chhattisgarh Story हरियाणा विधानसभा निवडणुकीतल्या मतमोजणीत छत्तीसगडमधील स्टोरी वेगळ्या प्रकारे रिपीट झाली. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने प्रचंड वातावरण निर्मिती केली होती. एक्झिट पोलने देखील त्या राज्यामध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असे निष्कर्ष दाखविले होते. हरियाणात देखील एक्झिट पोलने काँग्रेसच्याच सरकारकडे कल दर्शविला होता. परंतु, प्रत्यक्षात छत्तीसगडमध्ये जशी भाजपने बाजी मारली, तीच स्टोरी हरियाणात रिपीट झाली. हरियाणा तर अँटी इन्कम्बनसीचा फॅक्टर उद्ध्वस्त करून भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवल्याचे चित्र सुरुवातीच्या कलांमधून दिसून येत आहे. भाजपने बहुमताचा आकडा ओलांडल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कलांमधून दिसून येत आहे.Chhattisgarh Story
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कलानुसार हरियाणात भाजप 47, काँग्रेस 36, ओमप्रकाश चौटाला यांचा इंडियन नॅशनल लोकदल 1, दुष्यंत चौटाला यांचा जेजेपी 1 आणि अपक्ष 5 जागांवर आघाडीवर आहेत.
मूळात भाजपने बहुमताचा आकडा ओलांडल्याने त्यांना अपक्ष आमदारांच्या साथीची गरज नाही, पण प्रत्यक्षात अपक्ष आमदार सत्तेच्या बाजूने झुकतात, हा कल लक्षात घेता हरियाणात अपक्ष 5 आमदार निवडून आले तर ते भाजपच्या सत्तेच्या बाजूने राहतील हे उघड दिसत आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मुख्यमंत्री पदाच्या रेस मधले आघाडीचे नेते भूपेंद्रसिंग हुड्डा यांनी मात्र मतमोजणीचे सुरुवातीचे कल नाकारले आहेत. हरियाणा काँग्रेसचीच सत्ता स्थापन होईल, असा दावा काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांनी केला. त्यामध्ये भूपेंद्र सिंग हुड्डा यांचा मोठा वाटा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App