विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अखंड भारत कसा अस्तित्वात येईल??, या विषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी तपशीलवार व्यूहनीती सांगितली आहे. how will Akhand Bharat come into being?
पत्रकार परिषदेत त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यापैकी एक प्रश्न अखंड भारत कसा अस्तित्वात येईल?? हा एक प्रश्न होता. त्यावर बोलताना डॉ. मोहन भागवत यांनी अखंड भारताची संकल्पना प्रथम विशद केली. अखंड भारताचे मूलभूत स्वरूप प्रामुख्याने सांस्कृतिक आणि अध्यात्मिक आहे, असे नमूद करून सरसंघचालक म्हणाले, की अखंड भारत म्हणजे केवळ सध्याच्या देशाच्या राजकीय सीमा पुसून टाकणे नव्हे, तर भारताचा स्वभाव स्वीकारणे होय. भारताचा स्वभाव अमान्य होता म्हणून तर धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली आणि विभिन्न देश निर्माण झाले. पण आता त्या देशांनाच असे वाटू लागले आहे म, की आपली चूक झाली त्यामुळे तिथे देखील आपण परत अखंड भारत झाले पाहिजे अशी धारणा मूळ धरू लागली आहे. जागतिक भू राजनैतिक वातावरण देखील त्यासाठी पोषक बनत आहे.
याचे मी एक उदाहरण देतो. 1992 मध्ये सार्क संमेलनाचे अध्यक्षपद श्रीलंकेकडे होते आणि प्रेमदासा श्रीलंकेचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या भाषणात आपण सर्वजण अखंड भारताचा हिस्सा आहोत हे सांगितले होते. प्रेमदासा म्हणाले होते, की जगातले सगळे मोठे देश छोट्या देशांना गिळून टाकतात. त्यामुळे आपण एक राहायला पाहिजे. आपण या अखंड भारत भूमीचा एक हिस्सा आहोत हे मान्य केले पाहिजे तरच आपले अस्तित्व टिकून राहील.
डॉ. मोहन भागवत पुढे म्हणाले, या भूमीतले सगळे एकाच पूर्वजांचे वंशज आहेतच. आपण भारतीयांनी देखील आपल्या कृतीतून अखंड भारताची वाटचाल सुरूच ठेवली पाहिजे. भारत आज तेच करतो आहे. भारत मालदीवला पाणी पुरवतो. श्रीलंकेला पैसा पुरवतो. नेपाळला भूकंपामध्ये मदत करतो. बांगलादेशालाही आपण मदतच करतो.
आणि हे आपण सगळे सांगून करतो त्यामुळे त्या देशांमध्ये देखील आपल्या अखंड भारताविषयी आत्मीयता तयार होते. सेवाभावातून या भावनेला बळ मिळू शकते. त्यासाठी कोणत्या सीमा पुसण्याची गरज नाही, तर मनातून भारत भावाचा स्वीकार करणे म्हणजे भावना निर्माण करणे हाच अखंड भारत होय आणि त्या दिशेने आपण वाटचाल सुरू केली तर येत्या काही वर्षात अखंड भारत अस्तित्वात येईल याविषयी शंका नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App