विशेष प्रतिनिधी
नाशिक : दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व सोपवायचा शशिकांत शिंदेंचा दावा; पण अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने विलीनीकरणाचा विषयच संपवून टाकला!!, अशी राजकीय घडामोड आज घडली.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर आम्ही अजित दादांकडे संपूर्ण राष्ट्रवादीचे नेतृत्व सोपवणार होतो आता राष्ट्रवादीचे विलीनीकरण करून एक मजबूत पक्ष उभा करणे हीच अजित दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी मासिकात लेख लिहून केला. या लेखातून शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाच्या कढीला उकळी आणली.
पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी विलीनीकरणाचा विषय संपवून टाकला. यापुढे आमच्या पक्षाकडून विलीनीकरणाचा विषय संपवला आहे. कारण आम्हाला त्यांच्या पक्षामधल्या नेत्यांच्या हेतूंविषयी शंका आहे, असे सूरज चव्हाण यांनी नमूद केले. अजित पवारांचे नेतृत्व राष्ट्रवादीतल्या सगळ्या नेत्यांना आधीच मान्य होते. ज्यांना ते मान्य नव्हते, तिथेच मतभेद झाल्याने दोन राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे पक्ष झाले. आता सुनेत्रा पवार आमच्या सर्वोच्च नेत्या आहेत.
आधी काय झाले??, कुणाशी चर्चा झाली??, यावर चर्चा करत बसण्यापेक्षा भविष्या संदर्भात चर्चा करायला पाहिजे. त्यांना चर्चा करायची असेल तर ते सुनेत्रा पवारांसमोर चर्चेला येऊ शकतात. पण ते ज्या प्रकारे चर्चेला पुढे येत आहेत, त्यावरून त्यांचा हेतू योग्य दिसत नाही. त्या हेतूंवर आम्हाला शंका येते. कारण विलीनीकरणाच्या चर्चा माध्यमांमधून होत नसतात, असे सूरज चव्हाण यांनी सांगून विलीनीकरणाचा विषय संपवून टाकला.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष पातळीवर विलीनीकरण हा विषय चर्चेचा नाही असे सांगून अमोल मिटकरी यांनी सुद्धा तो विषय बासनात गुंडाळला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App