शाल, पुष्पगुच्छ नको, कन्नड भाषेतील पुस्तके देऊन सन्मान करा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची शासकीय कार्यक्रमासाठी आचारसंहिता

विशेष प्रतिनिधी

बेंगळुरू: शासकीय कार्यक्रमात अनावश्यक खर्च टाळण्यासाठी शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देण्याच्या प्रथेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंदी घातली आहे. याऐवजी कन्नड पुस्तके देऊन सन्मान करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. Honor by giving books in Kannada language, no shawl, no bouquet of flowers, Code of Conduct of Karnataka Chief Minister Basavaraj Bommai for government program

मुख्य सचिव पी रवी कुमार यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या निदेर्शानुसार यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले. मुख्यमंत्र्यांनी स्वत: या प्रथेचे पालन करण्यास सुरूवात केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाºयांच्या बैठकीता मुख्यमंत्र्यांनी फुलांचा पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला. प्रोटोकॉलच्या (राजशिष्टाचार) नावाने माला, शाल आणि पुष्पगुच्छ देण्याची प्रथा बंद केली जावी, असे म्हटले.



त्यानंतर, मुख्य सचिवांनी एक परिपत्रक जारी करून राज्य सरकार आणि सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या संस्थांच्या बैठका आणि कार्यक्रमांमध्ये हार, शाल, फुलांचे पुष्पगुच्छ, फळांच्या टोपल्या आणि स्मृतीचिन्हे देऊ नका असे निर्देश दिले. सर्व विभाग प्रमुखांना आणि सरकारी उपक्रमांना निदेर्शांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

नव्याने शपथ घेतलेले ऊर्जा आणि कन्नड आणि संस्कृती मंत्री व्ही सुनील कुमार यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणाराऱ्यांना हार आणि भेटवस्तू देऊ नका असे आवाहन केले होते. त्याऐवजी कन्नड पुस्तके मागितली होती. ही पुस्तके ते त्यांच्या करकला मतदारसंघातील ग्रंथालयाला देतील.

Honor by giving books in Kannada language, no shawl, no bouquet of flowers, Code of Conduct of Karnataka Chief Minister Basavaraj Bommai for government program

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात