विशेष प्रतिनिधी
हाँगकाँग : हाँगकाँगमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतली तर चक्क टेस्ला इलेक्ट्रॉनिक गाडी जिंकण्याची संधी मिळणार आहे. ज्यांचे लसीकरण ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण होईल त्यांना टेस्लाची ‘मॉडेल ३ लाँग रेंज’ या श्रेणीतील मोटार जिंकण्याची संधी मिळणार आहे. या गाडीची किंमत सुमारे ४७ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. Hong kong declares prizes foe vaccination
हाँगकाँगमध्ये लसीकरण अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. त्याचा वेग वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार देशाची लोकसंख्या साधारण ७५ लाख आहे. त्यापैकी केवळ १५.१ टक्के एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे.
लसीकरणासाठी हाँगकाँगमधील उद्योजकांकडूनही बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे. त्यात सोन्याची वीट, आयफोन अशा मौल्यवान व महागड्या वस्तू आहेत. काही कंपन्या, रेस्टॉरंट आणि महाविद्यालयेही लशीसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी व्हाउचर, रोख रक्कम आणि जादा वेळ देत आहेत. लस घेतलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना अर्जित रजा देण्याचे सरकारने जाहीर केले आहे.
लसीकरणासाठी हाँगकाँगमधील दोन मोठ्या कंपन्यांनी दोन कोटी डॉलर किमतीच्या प्रोत्साहन योजनांची घोषणा केली आहे. येथील सर्वांत मोठी बांधकाम कंपनी सन हंग काई प्रॉपर्टीज लिमिटेडने आयफोनसह अनेक बक्षीसे जाहीर केली आहेत. प्रसिद्ध उद्योजक ली शाउकी यांची हँडरसन लँड डेव्हलपमेंट कंपनी सोन्याच्या विटा देणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App