विशेष प्रतिनिधी
हाँगकाँग : कोणत्याही लोकशाही देशांत वृत्तपत्र स्वातंत्र हा लोकशाहीचा आत्मा मानले जाते. हाँगकाँगमध्ये मात्र त्यालाच नख लावण्याचा प्रयत्न चीनी ड्रॅगनने सुरु केला आहे. हाँगकाँगमधील मोकळीक चीनला कधीच खुपत नाही. त्यामुळे हरप्रकारे दडपशाहीचे धोरण राबवण्यावर चीन भर देत आहे. आता चीनच्या धोऱणांवर सातत्याने टीका करणारे हाँगकाँगमधील अॅपल डेली हे लोकशाहीवादी वृत्तपत्र बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा भंग केल्याचा आरोप वृत्तपत्र व्यवस्थापनावर ठेवण्यात आला आहे. मुख्य संपादक रायन लॉ आणि इतर चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अॅपल डेलीने २०१९ पासून ३० पेक्षा जास्त टीकात्मक लेख छापल्याच दावा पोलिसांनी केला. हाँगकाँग आणि चीनवर निर्बंध घालावेत असे आवाहन या लेखांद्वारे करण्यात आले.
सरकारी अधिकाऱ्यांनी या वृत्तपत्राची एक कोटी ८० लाख हाँगकाँग डॉलरची मालमत्ता गोठविली आहे. गेल्या आठवड्यात हाँगकाँग पोलिसांनी या वृत्तपत्राच्या कार्यालयावर छापे घातले होते. त्यावेळी तब्बल पाचशे पोलिसांनी त्यात भाग घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App