पुण्यानंतर नागपुरात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाने भरधाव कार गर्दीत घुसवली!


पाच जण गंभीर जखमी ; संतप्त जमावाने कार चालकास बेदम चोप दिला.


नागपूर : ‘हिट अँड रन’ची मालिका महाराष्ट्रात सुरूच आहे. पुणे पोर्शची घटना अजूनही लोक विसरलेले नाहीत, असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. आता नागपुरात भरधाव कारमुळे रस्ता अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.Hit and run in Nagpur after Pune The minor rammed the car into the crowd

नंदनवन पोलीस ठाण्यांतर्गत व्यंकटेशनगर चौकातील केडीके कॉलेजजवळ एक अल्पवयीन तरुण गाडी चालवत होता. अचानक त्याची स्कोडा गाडी नियंत्रणाबाहेर गेली, त्यानंतर ती प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही दुचाकींना धडकली आणि नंतर फळ-भाजी विक्रेते आणि काही पादचाऱ्यांच्या गर्दीत घुसली. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्यानंतर ती थांबली.त्यामुळे रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. फळ व भाजी विक्रेत्यांसह पाच जण जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तेथे अनेक वाहनांचे नुकसान झाले. संतप्त जमावाने अल्पवयीन मुलाला कारमधून बाहेर काढले आणि रस्त्यावर खेचले. यानंतर त्याला जमावाने बेदम मारहाण केली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता अखेर काही लोकांना त्याने मदतीचे आवाहन केले. त्यानंतर काही लोकांनी त्याला जमावापासून वाचवले आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. महेंद्र अग्रवाल, वंदना अग्रवाल, भाजी विक्रेते बसंती गोंड, गोलू साहू आणि कार्तिक अशी जखमींची नावे आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Hit and run in Nagpur after Pune The minor rammed the car into the crowd

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात