ऐतिहासिक; काबूल नदीच्या पाण्याने अयोध्येच्या राम जन्मभूमीवर अभिषेक!!

वृत्तसंस्था

अयोध्या : अयोध्येतील रामजन्मभूमीच्या संघर्षाला पूर्णविराम मिळून तेथे भव्य मंदिर उभे राहत असताना एक ऐतिहासिक घटना आज घडली. अखंड भारतातील गांधार देश अर्थात सध्याच्या अफगाणिस्थान मधील काबूल नदीच्या पाण्याने आज श्रीराम जन्मभूमीवर अभिषेक करण्यात आला.Historical; Abhishek on Ram Janmabhoomi of Ayodhya with the water of Kabul river

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते काबूल नदीचे पाणी गंगाजलात मिसळून या दोन पवित्र नद्यांच्या पाण्याचा संगम राम जन्मभूमीच्या मंदिर परिसरात करण्यात आला. हे पाणी मंदिराच्या कन्स्ट्रक्शन साइटवर वाहण्यात आले.



अफगाणिस्तानातील एका मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काबूल नदीचे पाणी पाठविले होते. श्रीराम जन्मभूमीवर मंदिर बांधताना ते वापरण्यात यावे, अशी तिची इच्छा आहे. या इच्छेचा सन्मान ठेवण्याची सूचना पंतप्रधान मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांना केली होती.

त्या सूचनेबरहुकूम स्वतः योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येमध्ये जाऊन काबूल नदीचे पाणी आणि गंगाजल यांचा संगम करून ते पाणी रामजन्मभूमीच्या कन्स्ट्रक्शन साइटवर अर्पण केले.एक प्रकारे अयोध्या नगरी आणि ऐतिहासिक काळातील गांधार देश यांचेच राम जन्मभूमीवर उभ्या राहात असलेल्या राम मंदिराच्या निमित्ताने हे ऐतिहासिक मिलन ठरले आहे.

Historical; Abhishek on Ram Janmabhoomi of Ayodhya with the water of Kabul river

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात