वृत्तसंस्था
देहराडून – पुष्करसिंह धामी यांची उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक झाल्यानंतर त्यांच्या मातोश्री विष्णा देवी यांना पुष्करसिंहांच्या वडीलांची आठवण झाली आहे. पुष्कर खूप मेहनती आहे. पुष्करला मुख्यमंत्री झालेले पाहायला आज त्याचे वडील हयात हवे होते, असे भावोत्कट उद्गार विष्णा देवी यांनी काढले आहेत. पुष्करसिंह धामी यांच्या पत्नी गीता यांनी देखील आपल्या पतीच्या मुख्यमंत्रीपदावरच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. His father wanted Pushkar to be the Chief Minister today; Emotional utterances of Pushkar Singh Dhami’s mother
तत्पूर्वी, माध्यमांनी सतत चर्चेत ठेवल्याने उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि उच्च शिक्षणमंत्री धनसिंह रावत यांचे समर्थक डेहराडूनच्या निवासस्थानाबाहेर जमले होते. त्यांच्या नावाचा समावेश राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य दावेदारांमध्येदेखील होता. आपल्या नेत्याची निवड झाली की त्याच्या घरासमोर ढोल वाजवून जल्लोष करायची समर्थकांची तयारी होती. ती सगळी तयारी वाया गेली. तिथे ढोल वाजले नाहीत. मिठाई वाटली नाही.
ढोल वाजले, मिठाई वाटली ती खातिमा येथील पुष्करसिंह धामी यांच्या घरी. पुष्करसिंह यांच्या नावाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी खातिमा येथील घरी गर्दी केली. ढोल वाजवून आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. या आनंदात त्यांच्या मातोश्री विष्णा देवी आणि पत्नी गीता या दोघी देखील सहभागी झाल्या.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांचे आभार मानते. त्यांनी पुष्करसिंह यांना राज्याची सेवा करण्याची संधी दिली. आम्ही मध्यमवर्गीय सामान्य परिवारातले आहोत. सामान्यांच्या समस्या पुष्करसिंह यांना चांगल्या माहिती आहेत. त्यांच्या कल्याणासाठी ते दिवसरात्र मेहनत करतात, असे उद्गार त्यांची पत्नी गीता यांनी काढले आहेत.
उत्तराखंड के अगले मुख्यमंत्री के तौर पर पुष्कर सिंह धामी के नाम की घोषणा होने के बाद खटीमा में उनके घर में खुशी का माहौल है। #Uttarakhand pic.twitter.com/UgzjjlJWx4 — ANI_HindiNews (@AHindinews) July 3, 2021
उत्तराखंड के अगले मुख्यमंत्री के तौर पर पुष्कर सिंह धामी के नाम की घोषणा होने के बाद खटीमा में उनके घर में खुशी का माहौल है। #Uttarakhand pic.twitter.com/UgzjjlJWx4
— ANI_HindiNews (@AHindinews) July 3, 2021
Uttarakhand: "I'm very happy but feeling a little sad that his father is not with us to see him (Pushkar Singh Dhami) as Chief Minister of Uttarakhand. He worked very hard for this," says Pushkar Singh Dhami's Mother Vishna Devi in Khatima pic.twitter.com/nuqH3UA7BV — ANI (@ANI) July 3, 2021
Uttarakhand: "I'm very happy but feeling a little sad that his father is not with us to see him (Pushkar Singh Dhami) as Chief Minister of Uttarakhand. He worked very hard for this," says Pushkar Singh Dhami's Mother Vishna Devi in Khatima pic.twitter.com/nuqH3UA7BV
— ANI (@ANI) July 3, 2021
Uttarakhand: "I want to thank the party's high command, PM Modi, Amit Shah, Rajnath Singh, and JP Nadda, & the people of the Khatima constituency. He came from a middle-class family & is aware of the problems of people," says Pushkar Singh Dhami's wife Geeta in Khatima pic.twitter.com/cBtdCFhcaQ — ANI (@ANI) July 3, 2021
Uttarakhand: "I want to thank the party's high command, PM Modi, Amit Shah, Rajnath Singh, and JP Nadda, & the people of the Khatima constituency. He came from a middle-class family & is aware of the problems of people," says Pushkar Singh Dhami's wife Geeta in Khatima pic.twitter.com/cBtdCFhcaQ
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App