फाटकी जीन्स पडली मुख्यमंत्र्यांना चांगलीच महागात, तीरथसिंह रावत यांच्या विधानावर चोहोबाजूनी टीका

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी फॅशन म्हणून महिलांकडून परिधान केल्या जाणाऱ्या फाटक्या जीन्सवर टीका केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. रावत यांच्या विधानावर सडकून टीका होत आहे. Celebrities lashes out on Uttarkhand CM Tirathsingh Rawat

रावत यांच्या वक्तव्यावर नेटीझन्सनी देखील टीकेची झोड उठविली असून अनेक सेलिब्रिटींनीही रावत यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. रावत यांच्या वक्तव्यावर राजकीय नेते, सेलिब्रिटी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


महिला फाटक्या जीन्स घालतात…हे कसले संस्कार? उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी व्यक्त केली चिंता


अभिनेत्री गुल पनाग, लेखक आणि संगीतकार वरून ग्रोव्हर, शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, राजदच्या नेत्या राबडी देवी आदी मंडळींनी रावत यांना धारेवर धरले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी तर रावत यांच्या विधानामुळे आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे. आम आदमी पक्षानेही त्यांच्यावर टीका केली आहे.

एका कार्यक्रमात बोलताना रावत यांनी विमानात अनुभवलेला प्रसंग सांगितला होता. बूट घातलेल्या महिलेने दोन्ही गुडघ्यांवर फाटलेली पँट घातली होती, तिच्या हातामध्ये बऱ्याच बांगड्या देखील होत्या. विशेष म्हणजे ती आपल्या दोन मुलांसमवेत प्रवास करत होती. महिला फाटकी जीन्स घालणार असेल तर ती कोणत्या प्रकारच्या मूल्यांची शिकवण देऊ पाहत आहे? असा सवाल रावत यांनी उपस्थित केला होता.

Celebrities lashes out on Uttarkhand CM Tirathsingh Rawat

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*