काश्मीरमधले सध्याचे मुस्लिम पंडितांमधूनच धर्मांतरित झालेत; गुलाम नबी आझादांचे परखड बोल


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : जम्मू काश्मीरचे भवितव्य इथल्या हिंदू, मुस्लिम, दलित या जनतेच्या हातात आहे. कोणी बाहेरून आलेले नाही इस्लाम कश्मीरमध्ये सहाशे वर्षांपूर्वी आला इथलेच पंडित इस्लाम मध्ये धर्मांतरित झाले, असे परखड बोल माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी ऐकले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.Hindu Religion is much older than Islam in India.Congress leader Ghulam Nabi Azad

जम्मू काश्मीरच्या भवितव्यासंदर्भात बोलताना गुलाम नबी आझाद म्हणाले, की भारतात इस्लाम धर्मापेक्षा हिंदू धर्म खूप जुना आहे. आपल्या देशातील मुस्लिम हे हिंदूंच्या धर्मांतरामुळे आणि काश्मीरमध्ये सर्व मुस्लिम काश्मिरी पंडितांमधूनच धर्मांतरित झाले. प्रत्येकाचा जन्म हिंदू धर्मातच होतो, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले.



इस्लाम मूळात 1500 वर्षांपूर्वी पश्चिमेकडे आला. तो 600 वर्षांपूर्वी भारतात आला. भारतातले काही लोक इस्लामी सैन्यात सामील झाले आणि नंतर धर्मांतर झाले. पण आता कोणी बाहेरून आले असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. जम्मू-काश्मीरचे भवितव्य इथल्या हिंदू, मुस्लिम, दलित या जनतेच्या हातात आहे त्यांनी एकत्र येऊन काश्मीरचे भवितव्य घडवायचे आहेत आणि आपणच आपल्या बळावर ते घडवू शकतो, असा मला विश्वास वाटतो, असे उद्गार गुलाब नबी आझाद यांनी काढले.

यासाठी त्यांनी स्वतःच्या संसदेतल्या भाषणाचा हवाला दिला. संसदेत देखील त्यांनी जम्मू-काश्मीर आणि भारताच्या एकता अखंडते संदर्भात असेच सम्यक विचार मांडले होते.

Hindu Religion is much older than Islam in India.Congress leader Ghulam Nabi Azad

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!