विशेष प्रतिनिधी
लखनौ : कर्नाटकात भाजप हरला असला तरी उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कमाल दिसली आहे महापालिका नगरपालिका नगरपंचायती निवडणुकांमध्ये भाजपने सगळीकडे झेंडे फडकवले आहेत. पण त्याहीपेक्षा योगींची कमाल अशा मुस्लिम बहुल शहरांमध्ये दिसली आहे, जिथे स्वातंत्र्यानंतर कधीच हिंदू नगराध्यक्ष झालेला दिसला नाही, ते शहर म्हणजे देवबंद आहे. Hindu mayor for the first time in 140 years in UP yogi adityanath
सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद हा संपूर्ण आशिया खंडातील मुस्लिमांचा धार्मिक आणि शैक्षणिक गड मानला जातो. येथेच मुस्लिमांची सर्वोच्च शिक्षण संस्था दारूल उलूम स्थित आहे. याच देवबंद मधून पाकिस्तान निर्मितीसाठी बौद्धिक – शैक्षणिक खतपाणी पुरवले गेले. मुस्लिम समाजासाठी येथूनच धार्मिक, राजकीय आणि सामाजिक फतवे निघतात. पण मुस्लिमांचे सर्वंकष वर्चस्व असलेल्या देवबंद नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी गेल्या 140 वर्षात प्रथमच गैर मुस्लिम व्यक्ती म्हणजे हिंदू नगराध्यक्ष झाला आहे.
नगरपालिका निवडणुकीत भाजपचे विपिन गर्ग यांनी समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, काँग्रेस या तीनही पक्षांनी दिलेल्या मुस्लिम उमेदवारांचा पराभव करून विजय मिळवला आहे. देवबंद नगरपालिका 1884 मध्ये ब्रिटिश राजवटीत स्थापन झाली. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत फक्त तेथे मुस्लिम उमेदवारच नगराध्यक्षपदी निवडून आले. 140 वर्षांनंतर प्रथमच हिंदू उमेदवाराने त्याचे मुस्लिम उमेदवारांचा पराभव करत नगराध्यक्ष पद मिळवले आहे.
विपिन गर्ग यांना 22659 मते मिळाली तर समाजवादी पक्षाच्या उमेदवार जहीर फातिमा यांना 17959 मते मिळाली, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार जमालुद्दीन अन्सारी यांना 7079 मते मिळाली, तर काँग्रेस उमेदवार नौशाद कुरेशी यांना 483 फक्त मते मिळू शकली. विपिन गर्ग 4700 मतांनी विजयी झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App