विशेष प्रतिनिधी
मुंबई : आयजीच्या जीवावर बायजी उदार, कर्नाटकातल्या काँग्रेसच्या विजयावर महाराष्ट्रात ठाकरे गट स्वार!!, अशी राजकीय अवस्था आज सिल्वर ओक मध्ये महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीत दिसली. Congress all alone won the election in karnataka, but Sanjay Raut gave credit to all opposition parties
कर्नाटकात विजय काँग्रेसचा झाला. भाजपला काँग्रेसने हरवून भाजप पेक्षा दुप्पट जागा जिंकल्या. हा विजय काँग्रेसने कर्नाटकात कोणत्याही दुसऱ्या पक्षाशी युती न करता मिळवला. पण या विजयाचे श्रेय मात्र संजय राऊत यांनी काँग्रेसच्या ऐवजी सर्व विरोधी पक्षांना दिले. कर्नाटकात केवळ काँग्रेसचा विजय झाला नाही, तर सर्व विरोधी पक्षांचा विजय झाला आहे असा दावा त्यांनी आजच्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत केला.
वास्तविक महाविकास आघाडीतले दोन घटक पक्ष ठाकरे गट आणि राष्ट्रवादी हे कर्नाटकात जाऊन स्वतंत्रपणे लढले होते. त्यांनी तिथे काँग्रेसशी युती केली नव्हती. निपाणीचा काँग्रेस उमेदवार राष्ट्रवादीने केलेल्या मत विभागणीमुळे पडला, तर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या तिन्ही पुरस्कृत उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. पण कर्नाटकात काँग्रेसचा एकहाती प्रचंड विजय झाल्यानंतर त्याचे श्रेय मात्र संजय राऊत यांनी सर्व विरोधी पक्षांना दिले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दोन्ही नेते उपस्थित होते. नानांसमोरच संजय राऊत कर्नाटकातल्या काँग्रेसच्या विजयाचे श्रेय सर्व विरोधी पक्षांना देऊन मोकळे झाले. पण त्यावर नानांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App