मणिपूरमध्ये लष्कर तैनात करण्याच्या राहुल गांधींच्या वक्तव्यावर हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल!

Assam CM Himanta Biswa Sarma To Bring Anti Love Jihad Law in state Says Hindu Boy Lying To Hindu Girl Is Jihad

१९९६ हवाई दलाकडून मिझोरमध्ये झालेल्या कारवाईचाही उल्लेख केला आहे.

विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी : मणिपूर हिंसाचारावरून संसदेत मोदी सरकार आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली आहे. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी सांगितले की, भारतीय लष्कर मणिपूरमध्ये “काहीही तोडगा काढू शकणार नाही आणि 100 दिवसांपेक्षा जास्त काळ चाललेल्या हिंसेवर तोडगा गोळ्यांनी नव्हे तर मनं जुळून निघाला पाहिजे.” Himanta Biswa Sarmas attack on Rahul Gandhis statement about deploying the army in Manipur

संघर्षग्रस्त ईशान्येकडील राज्याती संघर्ष लष्कर दोन दिवसांत थांबवले, असे सुचवणारे काँग्रेस खासदार राहुल गांधी लष्कराला नागरिकांवर गोळीबार करण्याचा सल्ला देत आहेत का?, असा सवालही मुख्यमंत्री सरमा यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत, अविश्वास प्रस्तावादरम्यान संसदेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामचा दिलेला संदर्भ (भारताने मिझोराममध्ये हवाई दलाच्या विमानांचा वापर करून 1966 मध्ये स्वतःच्या नागरिकांवर बॉम्बहल्ला केला) सांगितला.

हिमंता बिस्वा सरमा यांनी गुवाहाटी येथे पत्रकारांना सांगितले, “भारतीय हवाई दलाने आयझॉलमध्ये हे केले होते, हिंसाचार कमी होत असताना त्यांनी बॉम्ब टाकले. आज राहुल गांधी भारतीय लष्कराने मणिपूरमधील हिंसाचार थांबवावा, असे म्हणत आहेत. याचा अर्थ काय?  त्यांनी नागरिकांवर गोळीबार करावा? हा त्यांची उपाय आहे का? ते असे कसे म्हणू शकतात? लष्कर काहीही सोडवू शकणार नाही. अशा परिस्थितीत ते केवळ तात्पुरते शांतता प्रस्थापित करू शकतील. पण तोडगा गोळ्यांनी नाही तर हृदयातून यावा लागतो.’’

Himanta Biswa Sarmas attack on Rahul Gandhis statement about deploying the army in Manipur

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात