हिमाचल प्रदेश पोटनिवडणूक: काँग्रेसच्या सर्व ६ बंडखोरांवर भाजपने व्यक्त केला विश्वास, कोणाल कुठून दिल तिकीट?

हिमाचल प्रदेशमध्ये १जून रोजी लोकसभेच्या चार जागांसह सहा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.


विशेष प्रतिनिधी

शिमला : हिमाचल प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने ६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या सहाही नेत्यांना भाजपने तिकीट दिले आहे. पक्षाने धर्मशालामधून सुधीर शर्मा, लाहौल स्पीतीमधून रवी ठाकूर, सुजानपूरमधून राजिंदर राणा, बडसरमधून इंदर दत्त लखनपाल, गाग्रेटमधून चैतन्य शर्मा आणि कुतलाहारमधून दविंदर कुमार (भुट्टो) यांना तिकीट दिले आहे.Himachal Pradesh by election BJP expressed confidence in all 6 rebels of Congress announced candidature



हे सर्व नेते २३मार्च रोजी भाजपमध्ये दाखल झाले होते. या नेत्यांनी राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होट केले होते. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते सभागृहात अनुपस्थित राहिले. या प्रकरणी काँग्रेसच्या याचिकेवर सभापतींनी सहाही आमदारांना अपात्र ठरवले. तेव्हापासून हे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली.

हिमाचल प्रदेशमध्ये १जून रोजी लोकसभेच्या चार जागांसह सहा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आपले चारही उमेदवार यापूर्वीच जाहीर केले आहेत. सर्व उमेदवारही लवकरच प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा पोटनिवडणुकीचे निकालही ४ जूनला लागणार आहेत.

Himachal Pradesh by election BJP expressed confidence in all 6 rebels of Congress announced candidature

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात