ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देशात हिजाबवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे. हिजाबबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ओवैसी यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी म्हणतात की, मुस्लिम महिला त्यांना आशीर्वाद देत आहेत, मग भाजप मुस्लिम मुलींचा हिजाब घालण्याचा अधिकार का काढून घेत आहे? Hijab Controversy Owaisi says Blessings of Muslim women to PM Modi, then why BJP is taking away the right of hijab from girls?
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देशात हिजाबवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे. हिजाबबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ओवैसी यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी म्हणतात की, मुस्लिम महिला त्यांना आशीर्वाद देत आहेत, मग भाजप मुस्लिम मुलींचा हिजाब घालण्याचा अधिकार का काढून घेत आहे?
ओवैसी म्हणाले, हिजाब घालणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. तुम्ही भगवी शाल घालता, कोण रोखते?” त्यांनी समाजवादी पक्षाचे सुप्रीमो आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरही निशाणा साधला. ओवैसी म्हणाले की, अखिलेश हिजाबवर बोलायला घाबरतात. त्यांना मुस्लिमांची पर्वा नाही.
ओवेसी पुढे म्हणाले, “अखिलेश यांना मुस्लिमांची मते हवी आहेत, पण त्यांच्यासाठी काही करत नाहीत. अखिलेश यांना मुस्लिम म्हणण्याची भीती का वाटते? त्यांनी या विधानसभा निवडणुकीत अनेक मुस्लिम नेत्यांची तिकिटे कापली.” सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (SBSP) प्रमुख ओमप्रकाश राजभर यांच्याबाबत ओवैसी म्हणाले की, आम्ही त्यांच्याविरोधातही उमेदवार दिला आहे, कारण आमचे त्यांच्यावर प्रेम आहे.
यूपी निवडणुकीत एआयएमआयएमच्या विजयाबाबत ते म्हणाले की, आम्ही जोरदार लढत आहोत आणि त्याचे चांगले परिणाम येतील. मी उत्तर प्रदेशातून जाणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आम्ही गोरखपूरमध्ये प्रचार करणार आहोत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App