अर्बन नक्षलवाद्यांना मोडून काढत असतानाच उच्चशिक्षित इस्लामी जिहादी दहशतवाद्यांचे मोदी सरकार समोर नवे आव्हान!!

Modi government

नाशिक : देशातल्या नक्षलवादाला वेसण घालून अर्बन नक्षल्यांचेही आव्हान मोडीत काढत असताना केंद्रातल्या मोदी सरकार पुढे उच्चशिक्षित इस्लामी जिहादी दहशतवाद्यांचे नवे आव्हान उभे राहिले आहे.Highly educated Islami terrorism new challenge for Modi government

मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यांच्या तपास यंत्रणा यांच्यात चांगला समन्वय राखून नक्षलवादाचे आव्हान मोडून काढत आणले. देशातल्या पूर्वपट्ट्यात 115 जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव होता. तो कमी करत आणून आता 11 जिल्ह्यांपुरता सीमित केला महाराष्ट्र छत्तीसगड ओडिषा या राज्यांमध्ये बडे नक्षलवादी शरण आणले किंवा त्यांना मारले. त्याचबरोबर शहरी नक्षलवाद्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवून त्यांच्या नक्षलवादाला असलेला बौद्धिक इंधनपुरवठा मर्यादित करून ठेवला. मोदी सरकारचे हे यश विशिष्ट पातळीवर लक्षणीय ठरले.



उच्चशिक्षित इस्लामी दहशतवादाचे डोके वर

पण त्याच वेळी देशात उच्चशिक्षित इस्लामी जिहादी दहशतवादाने डोके वर काढले. शिक्षण आणि रोजगाराची कमतरता यामुळे युवक दहशतवादाकडे वळतात हा अर्बन नक्षलवाद्यांचा आणि लिबरल लोकांचा आवडता सिद्धांत होता. तो कायमच त्यांनी सरकार चालवणाऱ्या यंत्रणांच्या तोंडावर फेकून मारत आणला. दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात अर्बन नक्षलवाद्यांनी बौद्धिक अडथळा आणण्यात धन्यता मानली. पण या सगळ्याला मोदी सरकारने यशस्वीत्रित्या अटकाव केला. कायद्याच्या कसोट्यांवर सगळ्यांना वेसण घातली.

त्याचवेळी पाकिस्तान सारख्या दहशतवादी देशावर वचक ठेवणारी कारवाई केली. त्या कारवाईला आंतरराष्ट्रीय पातळीवरून पाठिंबा मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी कितीही बडबड केली तरी मोदी सरकारने पाकिस्तान विरुद्ध ची भूमिका सौम्य किंवा पातळ केली नाही.

 अल फलाह विद्यापीठाने झटकले हात

या पार्श्वभूमीवर देशात उच्चशिक्षित इस्लामी जिहादी दहशतवाद्यांनी डोके वर काढले त्यांनी देशांतलेच सर्व प्रकारचे material वापरून देशात विविध संवेदनशील ठिकाणी हल्ले करायचे षडयंत्र रचले. दिल्लीतल्या स्फोटानंतर ज्या 11 जणांना पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले, ते सगळेजण उच्चशिक्षित जिहादी दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले त्यापैकी दोन डॉक्टर्सनी हरियाणातल्या अल फलाह विद्यापीठातून रसायने चोरल्याचे उघड झाले. अल फलाह विद्यापीठाने या प्रकरणात हात झटकून टाकले पण म्हणून ते या सगळ्या प्रकरणातून बचावले असे समजायचे कारण नाही. अल फलाह विद्यापीठ कायद्याच्या कचाट्यात आणि तपास यंत्रणांच्या स्कॅनर खाली यायचे ते आलेच.

जिहादी तुर्कस्तानचा संबंध

दिल्लीतल्या स्फोटामुळे अर्बन नक्षलवाद्यांनी दहशतवादाला दिलेला अशिक्षितपणाचा आणि बेरोजगारीचा रंग उडून गेला. त्या उलट जिहादी दहशतवादाचा भेसूर उच्चशिक्षित चेहरा समोर आला. हेच आता मोदी सरकार पुढे मोठे आव्हान उभे राहिले. त्याचवेळी दिल्लीतल्या स्फोटाचे कनेक्शन फक्त पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशीच नव्हे तर तुर्कस्तानशी असल्याचे सुद्धा स्पष्ट झाले कारण दिल्ली स्फोटातले मुख्य संशयित डॉ. मोहम्मद उमर आणि डॉ. मुजम्मिल शकील या दोघांनी तुर्कस्तानचा दौरा केल्या असल्याचे उघड झाले. त्यामुळे तुर्कस्तान सारख्या घातक जिहादी देशाने फक्त ऑपरेशन सिंदूरच्याच वेळी पाकिस्तानची साथ दिल्याचे दिसून आले असे नाही तर आता भारतातल्या दहशतवादी घटनांची सुद्धा त्याच जिल्हा तुर्कस्तानचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले.

Highly educated Islami terrorism new challenge for Modi government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात