विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण थांबले आहे असा कांगावा महाराष्ट्र सरकार करत आहे. मात्र, महाराष्ट्राला सर्वाधिक लसपुरवठा केला आहे असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे. Highest vaccine supply in Maharashtra
लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेशला सर्वाधिक लस मिळायला हवी होती मात्र महाराष्ट्राला सर्वाधिक लसीचा पुरवठा केला गेला आहे .महाराष्ट्र सरकारच्या नियोजन शुन्य कारभारामुळे लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
लस तुटवड्याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘अनेक लसीकरण केंद्रांवर लस संपली आहे असे सांगितले जात आहे; परंतु केंद्र सरकार थेट लसीकरण केंद्रापर्यंत लस पुरवठा करत नाही.
केंद्र सरकार राज्य सरकारला लशीचा पुरवठा करते. त्यानंतर लसीकरण केंद्रापर्यंत लस पुरविणे हे राज्य सरकारची जबाबदारी आहे. यात जर कुठल्या राज्याने नियोजन नसेल आणि डोस खराब होत असतील, तर ते राज्य सरकारचं अपयश आहे.
को- व्हॅक्सिनवरून महाराष्ट्र आणि छत्तीसगढमध्ये राजकारण होत आहे. छत्तीसगढमध्ये आम्ही जानेवारीमध्ये को-व्हॅक्सिन लसीचे डोस पाठवले होते. मात्र, दोन महिन्यांपर्यंत तेथे लसीकरणच झाले नाही. मी आरोग्यमंत्र्यांना दोन आणि मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं. तेथे आता तीन महिन्यांनंतर लसीकरण सुरू केले आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक लसीचे डोस महाराष्ट्राला दिले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांना एक कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस पुरवले आहेत. लस वितरणात लोकसंख्येचा निकष नाही. लोकसंख्येचा विचार करायला गेलं, तर मग सर्वाधिक लस उत्तर प्रदेशला मिळायला हवी होती.’ असेही हर्षवर्धन म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App