Hezbollah : इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचा कमांडर सलीम ठार

Hezbollah

अमेरिकेत तब्बल एक कोटी डॉलर्सचे होते बक्षीस


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Hezbollah  लेबनीजचे माजी पंतप्रधान रफिक हरीरी यांच्या हत्येमध्ये सामील असलेला हिजबुल्लाचा कमांडर सलीम जमील अय्याश इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाला आहे. टाइम्स ऑफ इस्रायलने सौदी मीडिया अल अरेबियाच्या हवाल्याने सलीमच्या मृत्यूचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. अल अरेबियाने सूत्रांच्या हवाल्याने सोशल मीडियावर फिरत असलेल्या माहितीच्या आधारे हा रिपोर्ट दिला आहे. त्यात म्हटले आहे की, सलीमला सीरियातील अल-कुसेर शहराजवळ घेरण्यात आले होते.Hezbollah



हे शहर हिजबुल्लाहचा गड मानला जातो. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सलीमवर एक कोटी डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तो हिजबुल्लाहच्या हत्या पथकाच्या युनिट 151 चा वरिष्ठ सदस्य होता. लेबनीजचे माजी पंतप्रधान रफिक हरीरी यांच्या हत्येप्रकरणी 2020 मध्ये सलीमला संयुक्त राष्ट्रांच्या न्यायाधिकरणाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

2005 मध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटात हरिरी यांची हत्या झाली होती. तत्कालीन हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह याने सलीमला अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यास नकार दिला होता. 2004 ते 2005 दरम्यान लेबनीज राजकारण्यांवर झालेल्या तीन प्राणघातक हल्ल्यांप्रकरणी सलीमवर खटलाही चालवण्यात आला होता.

अनेक आघाड्यांवर युद्ध लढणाऱ्या इस्रायलमध्येही अंतर्गत कलह सुरू झाला आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांनी अचानक संरक्षण मंत्री पदावरून हटवल्यानंतर, इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक इयाल झामिर यांनी आता पदाचा राजीनामा देण्याची विनंती केली आहे. या संदर्भात, इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की इयाल झामिर यांनी आज सकाळी नवे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांच्याशी पहिली बैठक घेतली. यावेळी त्यांनी आपले पद लवकर सोडण्याची विनंती केली.

Hezbollah commander Salim killed in Israeli strike

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात