मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाचे हेमंत पाटील यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

लोकसभा अध्यक्ष यांच्या नावे हेमंत पाटील यांनी स्वतःच्या लेटर हेडवर राजीनामा लिहिला


विशेष प्रतिनिधी

हिंगोली : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केलेलं आहे, त्यामुळे मराठा समाज बांधव अधिकच आक्रमक होताना दिसत आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.Hemant Patil of Shinde group resigned from MP for Maratha reservation

मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणी केद्र सरकारच्या दरबारात मांडावी यासाठी मराठा आंदोलकांनी हेमंत पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी आंदोलकांनी त्यांना समाजासाठी खासदारकीचा राजीनामा देण्याची मागणी केली होती. यानंतर हेमंत पाटील यांनी आंदोलकांच्या मागणीवरून खासदारकीचा तत्काळ राजीनामा दिला. खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या नावे स्वतःच्या लेटर हेडवर राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.



दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत मराठा आरक्षण उपसमितीची सोमवारी सकाळी १० वाजता मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्यामधील मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीकडून ससरकारने माहिती मागवली आहे. आतापर्यंत काय कामे केली, याबाबतचा अहवाल उपसमितीला सादर करायचा आहे.

राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं, राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी, साखळी उपोषणं सुरू आहेत. याशिवाय मराठा समजातील तरुण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलही उचलत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवर मराठवाड्यातील शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळमध्ये येणार आहेत.

Hemant Patil of Shinde group resigned from MP for Maratha reservation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात