आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लान्स नाईक बी. साई तेजा यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सीएमओने ट्विटरवर ही माहिती दिली. Helicopter Crash CDS Rawats bodyguard Lance Naik Teja Family will Recieve Rs 50 lakh As Compansation, Andhra Pradesh CM announced
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लान्स नाईक बी. साई तेजा यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सीएमओने ट्विटरवर ही माहिती दिली.
साई तेजा हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी होते. ते पॅरा स्पेशल फोर्सचा भाग होते. जून २०१३ मध्ये तेजा भारतीय सैन्यात दाखल झाले. त्यांनी अरुणाचल प्रदेशातील एलएसीवरील अत्यंत उंचीच्या भागात सेवा बजावली. लान्स नाईक तेजा मणिपूर आणि नागालँडमधील बंडाविरोधातील कारवायांमध्येही सामील होते. ते मिश्र मार्शल आर्ट्स, निशस्त्र लढाई, संप्रेषण आणि इलेक्ट्रॉनिक युद्धात तज्ज्ञ होते.
Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy has announced Rs 50 lakhs ex-gratia to the family of Lance Naik B Sai Teja, who lost his life in the #TamilNaduChopperCrash crash on 8th Dec, which claimed 13 brave souls. He was serving as PSO to the CDS: Andhra Pradesh CMO (File photo) pic.twitter.com/DiFzyflnLT — ANI (@ANI) December 11, 2021
Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy has announced Rs 50 lakhs ex-gratia to the family of Lance Naik B Sai Teja, who lost his life in the #TamilNaduChopperCrash crash on 8th Dec, which claimed 13 brave souls. He was serving as PSO to the CDS: Andhra Pradesh CMO
(File photo) pic.twitter.com/DiFzyflnLT
— ANI (@ANI) December 11, 2021
लष्कराने म्हटले की, कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात बळी पडलेल्या आणखी पाच लष्करी जवानांच्या मृतदेहांची ओळख पटली असून ते त्यांच्या गावी पाठवले जात आहेत. लष्करी अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही तासांत ज्या लष्करी जवानांच्या मृतदेहांची ओळख पटली त्यात ज्युनियर वॉरंट ऑफिसर (JWO) प्रदीप, विंग कमांडर पीएस चौहान, JWO राणा प्रताप दास, लान्स नाईक बी. साई तेजा आणि लान्स नाईक विवेक कुमार यांचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App