स्वातंत्र्यदिना निमित्तचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत
विशेष प्रतिनिधी
शिमला : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 50 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या आणखी अनेक लोक भूस्खलनाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत, त्यामुळे हा आकडा आणखी वाढू शकतो. Heavy rains wreak havoc in Himachal killing more than 50 people so far
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 24 तासांत पावसामुळे 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एवढी भयानक परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती असे त्यांनी म्हटले आहे. सध्याची परिस्थिती पाहता स्वातंत्र्यदिनानिमत्तचे सांस्कृतिक कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, ‘गेल्या 24 तासांत राज्यात 50 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. 20हून अधिक लोक अजूनही गाडले गेले आहेत, मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. स्वातंत्र्यदिनी कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे.
हिमाचल प्रदेशच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सोलन जिल्ह्यातील एका गावात ढगफुटीमुळे एकाच कुटुंबातील सात जणांना जीव गमवावा लागला आहे. रविवारी रात्री उशिरा जडों गावात ही घटना घडली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App