भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना अलर्ट जारी केला आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये हाहाकार पाहायला मिळत आहे. दिल्लीपासून गुजरात ( Gujrat )आणि राजस्थानपर्यंत ( Rajstan ) मुसळधार पाऊस पडत आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसानंतर पूर आला आहे. राज्यात नद्यांना उधाण आले आहे. परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्याचबरोबर हवामान खात्यानेही अनेक राज्यांना अलर्ट जारी केला आहे.
गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफची टीम मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहे. आतापर्यंत अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. एनडीआरएफ व्यतिरिक्त, एसडीआरएफ, लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दल देखील बचाव कार्यात गुंतले आहेत.
दुसरीकडे, गुजरात व्यतिरिक्त, हवामान खात्याने दिल्ली, महाराष्ट्र, बंगाल, तेलंगणा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसह 14 राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे.
रात्री उशिरा दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. रस्त्यांवर वाहने रेंगाळताना दिसत होती. सकाळी ऑफिसला जाणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App