विशेष प्रतिनिधी
चेन्नई – तमिळनाडू आणि पुदुच्चेरीत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टीचे संकट लक्षात घेऊन राज्यातील नऊ जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Heavy rain in Tamilnadu
चेन्नई, कांचीपुरम, तिरूवल्लूर, चेंगालपेट, कुड्डलूर, नागापट्टीणम, तंजावूर, तिरूवरूवर आणि मायीलादुथुराई या जिल्ह्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Heavy Rain : मुंबईसह महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस, चाळीसगाव परिसरात पाणीच पाणी, कन्नड घाटात दरड कोसळली
राष्ट्रीय आपत्ती कृती दलाची (एनडीआरएफ) तेरा पथके विविध भागांत तैनात करण्यात आली असून यात एकट्या चेन्नईमध्ये पाच पथके आहेत. अन्य तीन पथकांना पाठिंब्यासाठी या भागांत सज्ज ठेवण्यात आले आहेत.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून यामुळे तमिळनाडू, दक्षिण किनारी आंध्रप्रदेश, रायलसीमा या भागांसाठी पुढील चोवीस तास महत्त्वपूर्ण असतील. वादळाचा धोका लक्षात घेऊन मच्छीमारांना आताच समुद्रामध्ये जाऊ नका, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App