विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपुरम – केरळच्या पाच जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पठणामथिट्टा, कोट्ट्यायाम, एर्नाकुलम, इडुक्की आणि थ्रिशूरसारख्या जिल्ह्यात येत्या काही दिवसांत अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.Heavy rain in all parts of Kerala
केरळच्या अनेक जिल्हयात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाच जिल्हयात जोरात पाऊस सुरू असून गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत.
कळव्यात दरड कोसळून 5 जण ठार, ढिगाऱ्याखालून 2 जणांची सुटका, रेस्क्यू ऑपरेशन सुरू
दरम्यान, हवामान खात्याने केरळ किनाऱ्यापासून काही अंतरावर अरबी समुद्रात कमी दबावाचे क्षेत्र निर्माण झाल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी १७ ऑक्टोबरपर्यंत अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्याचबरोबर १८ ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पावसामुळे राज्यात काही ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी केरळ सरकारने हवाई दलाची मदत मागितली आहे. कोट्ट्याम जिल्ह्यातील कुट्टीकल येथे भूस्खलनाचे प्रकार घडले असून तेथे अडकलेल्या कुटुंबीयांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाची मदत मागितली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App