वृत्तसंस्था
कोलकाता : कोलकाता (Kolkata )येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये 14 ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचारासंदर्भात शुक्रवारी कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्य सरकार आणि पोलिसांना फटकारताना सरन्यायाधीश म्हणाले – 7 हजारांचा जमाव रुग्णालयाची तोडफोड करण्यासाठी आला होता. पोलीस काय करत होते?
यावर पश्चिम बंगाल सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितले की, हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराचे नळकांडे डागण्यात आले. तसेच 15 पोलीस जखमी झाले आहेत. डीसीपीही जखमी झाले आहेत. पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली.
यावर सरन्यायाधीश टीएस शिवग्ननम म्हणाले – अशा प्रकरणांवर 144 लादता आले असते. 7000 लोक एकाच वेळी येऊ शकत नाहीत. हे राज्य सरकारचे साफ अपयश आहे. पोलिसांना स्वत:ला वाचवता येत नाही. तुम्ही डॉक्टरांना कसे वाचवाल?
काय आहे संपूर्ण प्रकरण..
8-9 ऑगस्टच्या रात्री बलात्कार आणि प्राणघातक हल्ल्यानंतर प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा गळा दाबून खून करण्यात आला. पोलिसांनी 12 ऑगस्ट रोजी शवविच्छेदन अहवाल प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. ज्यात रानटीपणा उघड झाला.
मृत प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या खाजगी भागावर खोल जखमा आढळल्या. आरडाओरडा दाबण्यासाठी आरोपींनी डॉक्टरचे नाक, तोंड आणि घसा सतत दाबला. गळा दाबल्याने थायरॉईड कूर्चा तुटला होता. डॉक्टरचे डोके भिंतीवर दाबले गेले, जेणेकरून ती किंचाळू नये. पोट, ओठ, बोटे आणि डाव्या पायावर जखमा आढळल्या. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर एवढ्या जोरावर हल्ला केला की तिचा चष्मा फुटला आणि काचेचे तुकडे तिच्या डोळ्यात घुसले. दोन्ही डोळे, तोंड आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत होता.
ऑल इंडिया गव्हर्नमेंट डॉक्टर्स असोसिएशनच्या अतिरिक्त सचिव डॉ. सुवर्णा गोस्वामी यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टचा हवाला देत हा बलात्कार नसून सामूहिक बलात्कार असू शकतो, असे सांगितले. त्यांनी सांगितले की प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या प्रायव्हेट पार्टमधून 151mg वीर्य सापडले आहे. इतके प्रमाण कोणा एका व्यक्तीचे असू शकत नाही.
प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येनंतर देशभरात डॉक्टरांचा संप आणि आंदोलने होत आहेत. 14 ऑगस्ट रोजी अशाच एका निदर्शनात जमावाने हिंसक होऊन हॉस्पिटलची तोडफोड केली. राज्य सरकार आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App