वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमधील संदेशखली गावात राहणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणावर आज म्हणजेच 19 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती बीवी नागरथना आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. v
संदेशखली लैंगिक हिंसाचार प्रकरणाची सुनावणी 16 फेब्रुवारीला करण्याचे न्यायालयाने मान्य केले होते. संदेशखली लैंगिक हिंसाचाराची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याशिवाय एसआयटीचा तपास पश्चिम बंगालच्या बाहेर करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यावर तत्काळ सुनावणी घेण्याचे आवाहन करण्यात आले, मात्र न्यायालयाने त्यावर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला.
संदेशखली येथे महिलांनी टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. शाहजहान शेख ज्याला पाहिजे त्याला आपल्या वासनेचा शिकार बनवायचा, असे महिलांचे म्हणणे आहे. रेशन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या छाप्यानंतर शाहजहान फरार आहे.
जमीन बळकावणे आणि महिलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एकूण तीन मुख्य आरोपी आहेत. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. TMC नेते शिबप्रसाद हाजरा आणि उत्तम सरदार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आतापर्यंत एकूण 18 जणांना अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा संदेशखलीला जाणार
राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या – संदेशखलीमधून त्रासदायक बातम्या येत आहेत. म्हणूनच मी स्वतः जात आहे. पश्चिम बंगालच्या डीजीपींना भेटणार, स्थानिक पोलिसांना भेटणार. पीडित महिलांशी मी बोलणार आहे. संदेशखलीतील प्रत्येक गल्लीबोळात जाऊन महिलांना भेटेन, जेणेकरून पीडित महिलांना न्याय मिळेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App