राजस्थानातील झालवाड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि खासदार दुष्यंत सिंग यांचे ‘आपण यांना पाहिलेत का?’ असे लिहिलेले पोस्टर लावण्यात आले आहे. हरविलेल्यांचा शोध घेत आहोत, असे या पोस्टरमध्ये म्हटले आहे. कोरोनाच्या संकटातही झालवाडच्या आमदार आणि खासदार दिसत नसल्याने हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.Have you seen them, Posters of former Chief Minister Vasundhara Raje and MP Dushyant Singh were displayed in Jhalawar
विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानातील झालवाड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि खासदार दुष्यंत सिंग यांचे ‘आपण यांना पाहिलेत का?’ असे लिहिलेले पोस्टर लावण्यात आले आहे. हरविलेल्यांचा शोध घेत आहोत, असे या पोस्टरमध्ये म्हटले आहे.
कोरोनाच्या संकटातही झालवाडच्या आमदार आणि खासदार दिसत नसल्याने हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या झालवाडच्या आमदार आहेत. त्यांचा मुलगा दुष्यंत सिंग हे येथील खासदार आहेत.
कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून हे दोघे मतदारसंघात फिरकलेही नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यांना शोधून देणाऱ्यास बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. या पोस्टरवर म्हटले आहे की, प्रिय आमदार वसुंधराजी व खासदार दुष्यंतजी, कोरोनाच्या महामारीत आपण झालवाडच्या नागरिकांना सोडून कोठे गेला आहात.
घाबरू नका, परत या. लोकांचे काय ते तर दोन-चार दिवसांत विसरून जातील. आपण पुन्हा एकदा आपली भ्रष्टाचारी व्यवस्था सहजपणे चालू शकाल. आपल्याला कोणीही काही म्हणणार नाही. झालवाडची वैतागलेली जनता नावाने हे पोस्टर्स लवण्यात आले आहेत. या दोघांचा पत्ता सांगणाºयास आकर्षक इनाम दिले जाईल, असेही म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App