विशेष प्रतिनिधी
चंदीगड : कृषी कायद्यांविरोधात प्रदीर्घ काळ सुरू असलेले आंदोलन संपल्यानंतर काही दिवसांनी शेतकरी पुन्हा एकदा या प्रश्नांवर एकत्र येताना दिसत आहेत. सोमवारी, भिवानी, जिंद, हिस्सार, रोहतक, फतेहाबाद, सिरसा आणि कर्नाल या सात जिल्ह्यांतील शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉली आणि इतर वाहनांसह हरियाणातील कर्नाल मिनी सचिवालयासमोर जमले आणि त्यांनी धरणे आंदोलन केले. Haryanvi farmers in agitation mood again
सुमारे २०० किमी अंतरावरून शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉलीने आले. ताडपत्रीच्या ट्रॉल्या व त्यामधील खाद्यपदार्थ, गाद्या, पलंग आदी साहित्य पाहून शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या मूडमध्ये आल्याचे जाणवले. यावेळी त्यांच्या हातात १३ मुद्दांवरचे मागणीपत्र -पॉइंट इंडेंट आहे.
पगड़ी संभाल जट्टा किसान संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली दक्षिण हरियाणातील जिल्ह्यांतील शेतकरी सीएम सिटीमध्ये एकत्र येत आहेत. काही दिवसांपूर्वी या समितीने कर्नाल येथून राज्यव्यापी संघर्षाची घोषणा केली होती. सोमवारी पुन्हा कर्नाल येथून मंगळवारी दुपारी धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली.
भारतीय किसान युनियन चादुनी ग्रुपचे राज्य कार्यकारिणी सदस्य जगदीप औलख, आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष बहादूरसिंग मेहला, इतर शेतकरी संघटनांचे पदाधिकारी राजेंद्र आर्य, गुरुमुख सिंग यांच्यासह अखिल भारतीय किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनस्थळी संबोधित केले.
कर्नालमध्येच शेतकऱ्यांनी रात्री तळ ठोकला आहे. त्यांच्यासाठी धार्मिक संस्थांकडून लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी ते पुन्हा मिनी सचिवालयासमोर धरणे धरणार आहेत. आगामी आंदोलनाची रणनीती काय असेल हे मंगळवारीच समोर येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App