Haryana result : हरियाणाच्या निकालात भाजपच्या बहुमताच्या पुढे, इकडे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी चढाओढ


वृत्तसंस्था

चंदिगड : हरियाणातील 90 जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलामध्ये राज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र नंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपने बहुमताचा आकडा केव्हाच ओलांडला आहे. हाच कल कायम राहिल्यास भाजप निर्विवादपणे पुन्हा सत्ता स्थापन करेल. परंतु यादरम्यान काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी सुरू झाली आहे. BJP majority in Haryana results, here is Congress in the race for Chief Ministership

खासदार कुमारी शैलजा म्हणाल्या की, जसजशी मतमोजणी पुढे सरकत आहे. काँग्रेस पक्षाला आणखी बळ मिळेल. राज्यात काँग्रेस सरकार स्थापन करेल आणि आम्ही 60 पेक्षा जास्त जागा जिंकू. काँग्रेस सरकार स्थापन करेल, असा आम्हाला विश्वास आहे. काँग्रेसचे सरकार आल्यास मुख्यमंत्रीपदासाठीच्या दाव्याबाबतच्या प्रश्नाला त्यांनी सकारात्मक उत्तर दिले. मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर त्या अजूनही ठाम आहेत का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर शैलजा म्हणाली, हो, का नाही.


Harshvardhan Patil : हर्षवर्धनना पक्षात घ्यायची पवारांची घाई; इंदापूरातल्या पवार निष्ठावंतांचाच उद्रेक होई!!


दरम्यान, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा म्हणाले की, हरियाणात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. आम्ही पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करू.

हरियाणातील 90 जागांवर झालेल्या मतमोजणीमध्ये, भाजपला बहुमत मिळाल्याचे आत्तापर्यंतचे ट्रेंड दिसून आले आहेत. या ट्रेंडमध्ये भाजप 50 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसला केवळ 34 जागांवर आघाडी मिळाली आहे. याशिवाय आयएनएलडी तीन जागांवर, तर इतर पाच जागांवर आघाडीवर आहेत.

Haryana results, here is Congress in the race for Chief Ministership

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात