विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीतले एक्झिट पोल काँग्रेसची एक हाती सत्ता दाखवत होते परंतु प्रत्यक्ष मतमोजणीत हे एक्झिट पोलचे निष्कर्ष खोटे ठरल्याचा कलच दिसून येत असून निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार 79 पैकी 38 जागांवर भाजपने मुसंडी मारली आहे, तर 36 जागांवरच काँग्रेस पुढे असल्याचे चित्र दिसत आहे. ओम प्रकाश चौटाला यांची इंडियन नॅशनल लोक दल 1 आणि दुष्यंत चौटाला यांची जेजेपी 1 असा हरियाणाचा सुरुवातीचा ट्रेंड आहे. Haryana Election result bjp better than congress
#HaryanaElections | BJP leading on 38, Congress on 36, INLD and BSP on 1 each as per the latest EC data. pic.twitter.com/A28bfPPOvJ — ANI (@ANI) October 8, 2024
#HaryanaElections | BJP leading on 38, Congress on 36, INLD and BSP on 1 each as per the latest EC data. pic.twitter.com/A28bfPPOvJ
— ANI (@ANI) October 8, 2024
हरियाणा काँग्रेसची एकहाती सत्ता येणार. काँग्रेस 60 पेक्षाही जास्त जागा मिळू शकतील, असा दावा सिरसाच्या खासदार शैलजा कुमारी यांनी केला होता. त्या मुख्यमंत्रीपदाच्या रेस मध्ये एक महत्त्वाच्या नेत्या आहेत. काँग्रेसच्या सत्तेच्या चाहुलीमुळे पक्षामध्ये मुख्यमंत्री पदाची रेस तीव्र झाली. एक्झिट पोलने देखील हरियाणात काँग्रेसला 44 ते 54 आणि भाजपला 28 ते 30 जागाच दिल्या होत्या परंतु प्रत्यक्षात मात्र सुरुवातीच्या ट्रेनमध्ये तरी भाजप पुढे दिसत असून काँग्रेस पिछाडीवर पडल्याचे चित्र निर्माण झाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App