Haryana : हरियाणात एक्झिट पोल फेल, मोठा उलटफेर; बहुमताचा आकडा ओलांडून भाजपची 47 वर मुसंडी; काँग्रेसची 36 जागांसह पिछाडी!!

Haryana

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Haryana हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीतले एक्झिट पोल काँग्रेसची एक हाती सत्ता दाखवत होते. परंतु प्रत्यक्ष मतमोजणीत हे एक्झिट पोलचे निष्कर्ष खोटे ठरल्याचा कलच दिसून येत असून निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार 90 पैकी 47 जागांवर भाजपने मुसंडी मारली आहे, तर 36 जागांवरच काँग्रेस पुढे असल्याचे चित्र दिसत आहे. ओम प्रकाश चौटाला यांची इंडियन नॅशनल लोक दल 1 आणि मायावती यांची बहुजन समाज पार्टी 1, अपक्ष 5 असा मतमोजणीच्या 4 राऊंड नंतर हरियाणातले हे चित्र आहे.Haryana



हरियाणा काँग्रेसची एकहाती सत्ता येणार. काँग्रेस 60 पेक्षाही जास्त जागा मिळू शकतील, असा दावा सिरसाच्या खासदार शैलजा कुमारी यांनी केला होता. त्या मुख्यमंत्रीपदाच्या रेस मध्ये एक महत्त्वाच्या नेत्या आहेत. काँग्रेसच्या सत्तेच्या चाहुलीमुळे पक्षामध्ये मुख्यमंत्री पदाची रेस तीव्र झाली. एक्झिट पोलने देखील हरियाणात काँग्रेसला 44 ते 54 आणि भाजपला 28 ते 30 जागाच दिल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात मात्र सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये तरी भाजप पुढे दिसत असून काँग्रेस पिछाडीवर पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हरियाणात गेम पलटल्याचे चित्र निर्माण झाले असून अजूनही काँग्रेस नेते आपल्या हातातून सत्ता तिसऱ्यांदा निसटल्याचे मान्य करायला तयार नाही माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा, काँग्रेस प्रवक्ते पवनखेडा सुप्रिया श्रीनेत यांनी हरियाणात काँग्रेसच सत्तेवरील असा पुन्हा दावा केला आहे. सुप्रिया श्रीनेत यांनी तर निवडणूक आयोगावर आक्षेप घ्यायला सुरुवात करून निवडणूक आयोगाची वेबसाईट अपडेट केलेले आकडे दाखवत नसल्याचा आरोप केला आहे.

Exit Poll Fails in Haryana, Big Upheaval; BJP crosses the majority figure to 47; Congress lags behind with 36 seats!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात