अमेरिकेने जसे लादेनला उडविले, तसेच भारताने निज्जरला मारले तर चूक काय??; पेंटॅगॉनच्या अधिकाऱ्याने सुनावले

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग नेचर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्या राजनैतिक संबंधात जो तणाव निर्माण झाला आहे, त्यावर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथेनी ब्लिंकेन यांनी भारताला सुनावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याच पेंटागॉनच्या एका अधिकाऱ्याने अमेरिकेला त्यावरून सुनावले आहे. Hardeep Singh Nijjar was not simply a plumber any more than Osama Bin Laden was a construction engineer.

अमेरिकेने ओसामा बिन लादेन आणि कासिम सुलेमानी या दोन दहशतवाद्यांना दुसऱ्या देशात घुसून मारले, तसेच जर भारताने हरदीप सिंह निज्जरला कॅनडात घुसून मारले असेल, तर त्यात चूक काय??, असा बोचरा सवाल पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबीन यांनी केला आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकेन आणि अमेरिकन प्रशासनाचे त्यांनी वाभाडेच काढले. ज्यावेळी ज्यावेळी अमेरिकन प्रशासन आंतरराष्ट्रीय दडपशाही बद्दल बोलतेय, त्यावेळी खरं म्हणजे तो आंतरराष्ट्रीय दहशतवाद असतो. हरदीपसिंग निज्जर हा काही साधा प्लंबर नव्हता. त्याचे हात शेकडो निरपराध्यांच्या रक्ताने माखले होते. अँथनी ब्लिंकेन ज्यावेळी विशिष्ट भूमिकेतून फॅक्ट्सवर बोलतात, त्यावेळी अमेरिका दांभिक भूमिका घेत असते.

कारण अमेरिकेने इराक युद्धात जे केले, ओसामा बिन लादेन आणि सुलेमान कासिम सुलेमानला ज्या पद्धतीने दुसऱ्या देशांमध्ये घुसून मारले, त्याच पद्धतीने जर भारत आणि हरदीप सिंग निज्जरला कॅनडात घुसून मारले असेल, तर त्या चूक काय??, असा सवाल मायकेल रुबीन यांनी केला आहे.

भारत कॅनडा यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेन प्रशासन स्वतःला अलग राखून एकदम उपदेशकाच्या भूमिकेत गेल्याने त्यांच्याच माजी अधिकाऱ्याने प्रशासनाला सुनावत भारताची बाजू उचलून धरली आहे.

Hardeep Singh Nijjar was not simply a plumber any more than Osama Bin Laden was a construction engineer.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात