विशेष प्रतिनिधी
काशी :श्री काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनानिमित्त वर्ष 2022 च्या पहिल्या दिवशी महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमांतर्गत नवीन विक्रम केला जाणार आहे.काशी विश्वनाथ दरबारात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शनिवारी 1001 शंखांचा शंखनाद करून विश्वविक्रम करण्याची जय्यत तयारी सुरू आहे.HAPPY NEW YEAR 2022: Concussion will resound all over the world! Concussion of 1001 people from Kashi Vishwanath Dham on New Year’s Day
विश्वनाथ धाममधून होणारी शंखध्वनी जगभर ऐकू येईल. प्रयागराज येथील नॉर्थ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर (NCZCC) द्वारे याचे आयोजन केले जाईल. सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत कार्यक्रम प्रस्तावित आहे.
शंख वादनासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. या जाहिरातीची खूप चर्चा झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातून सुमारे 1500 शंख वादकांनी अर्ज केले होते. त्यापैकी 20 अर्ज हे प्रयागराजचे आहेत. याशिवाय ईशान्येकडील 200 शंख वादकांचा समावेश आहे.
सादरीकरणाची तालीम शुक्रवारी संध्याकाळी मंदिर परिसरात झाली
शंख वाजवणाऱ्यांसाठी पारंपारिक वेशभूषा विहित करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष कुर्ता-पायजामा किंवा धोती -कुर्ता घालतील. महिला साडी-सलवार सूट घालतील. शंखपथकात सहभागी होणाऱ्यांना एक हजार रुपये मानधन आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
नववर्षानिमित्त श्री काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी भाविकांची मोठी रांग लागणार आहे. देशभरातील अनेक राज्यातून भाविक कशीला पोहोचत आहेत. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दर्शनाची व्यवस्था केली आहे.
दुसरीकडे संकटमोचन, दुर्गाकुंड, बीएचयू विश्वनाथ, शूलटंकेश्वर महादेव यासह बहुतांश मंदिरांमध्ये दर्शन आणि पूजेची व्यवस्था करण्यात आली आहे. गंगा घाटावर माँ गंगेच्या विशेष आरतीने नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App