योगी आदित्यनाथ 50 वर्षांचे झाले आहेत. 20 वर्षांचे असताना त्यांनी खासदार किंवा मुख्यमंत्री होण्याचा विचारही केला नव्हता. B.Sc नंतर आपल्या मुलाने M.Sc करावे अशी आई वडिलांची इच्छा होती. कॉलेजच्या काळात मेहुण्याची इच्छा होती की त्यांनी डावे व्हावे. पण नियतीला वेगळेच मंजूर होते. योगींना त्यांचे गुरू अवैद्यनाथ भेटले आणि पुढे जे घडले तो इतिहास झाला आहे. Happy Birthday CM Yogi interesting story about How Ajay Singh Bisht become Yogi Adityanath
12पर्यंत शिकताना तीन शाळा बदलल्या
महंत होण्यापूर्वी योगी आदित्यनाथ यांचे नाव अजय बिष्ट होते. अजय बिष्ट यांचा जन्म 5 जून 1972 रोजी उत्तराखंडमधील पौरी गडवाल जिल्ह्यातील पंचूर गावात झाला. जवळच्या थांगरच्या प्राथमिक शाळेतून आठवीपर्यंत शिक्षण घेतले. नववीच्या शिक्षणासाठी चमकोटखलचे जनता इंटर कॉलेज निवडले. इंटरमिजिएटच्या शिक्षणासाठी ऋषिकेशला गेले. त्यांनी भारत मंदिर इंटर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले.
कॉलेजला पोहोचल्यावर मेहुण्यांनी डाव्या पक्षांत जाण्याची ऑफर दिली
1989 मध्ये अजय सिंह यांनी कोटद्वारच्या सरकारी पीजी कॉलेजमध्ये बीएससीला प्रवेश घेतला. गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय निवडले. अभ्यासासोबतच ते महाविद्यालयीन विद्यार्थी राजकारणातही उतरले.
योगीगाथा या पुस्तकात शंतनू गुप्ता लिहितात, ‘अजय बिश्ट यांची बहीण कौशल्या यांचे पती आणि त्यांचा भाऊ कोटद्वारमधील डाव्या संघटनेशी संबंधित होते. मेहुण्याच्या भावाने अजय यांना कॉलेजमध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या डाव्या संघटनेत सामील होण्याची ऑफर दिली. पण योगींनी नकार दिला.
अभाविपच्या विरोधात निवडणुकीत उतरले
कॉलेजमध्ये त्यांनी अभाविपमध्ये प्रवेश केला. यात प्रमोद रावत उर्फ टुन्ना याची महत्त्वाची भूमिका होती. अजय यांनी पहिल्या वर्षी अभाविपचा प्रचार केला. दुसऱ्या वर्षी त्यांनी स्वत: निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि सचिवपदासाठी तिकीट मागितले. पुढील वर्षी देण्याचे आश्वासन संस्थेने दिले. पुढच्या वर्षीही त्यांना अभाविपने तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. अरुण तिवारी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
मुलाने नोकरी करावी, अशी होती आईची इच्छा
अजय बिश्ट यांच्या मातोश्री सावित्री देवी यांची इच्छा होती की मुलानेही वडिलांप्रमाणे सरकारी नोकरी करावी. त्यामुळे अजय यांच्या शिक्षणात त्यांनी कोणतीही कसर ठेवली नव्हती. अजय सिंह यांचे वडील आनंद बिश्ट सांगत होते, “अजयने गोरखपूरमध्ये जेव्हा संन्यास घेतला होता तेव्हाही मला आणि सावित्रीला त्याला परत आणायचे होते. आपल्या मुलाला भगव्यात पाहून सावित्री रडली हाती.”
राम मंदिर आंदोलन ठरले टर्निंग पॉइंट
शंतनू गुप्ता ‘योगीगाथा’मध्ये लिहितात, ‘अजय बिश्ट ऋषिकेशमध्ये M.Sc चे शिक्षण घेत होते, पण श्री रामजन्मभूमी आंदोलनाकडे झुकल्यामुळे त्यांचे शिक्षण मागे पडेल. 1993 मध्ये अजय गोरखपूरच्या गोरखधाम मंदिरात आले होते. महंत अवैद्यनाथ यांची भेट घेतली. महंतांनी अजयची संपूर्ण कहाणी ऐकली आणि म्हणाले, ‘तू जन्मजात योगी आहेस, एक दिवस तू इथे नक्की येशील.’ महंत यांनी यापूर्वी 1990 मध्येही योगींची भेट घेतली होती.
मे 1993 मध्ये अजय पुन्हा एकदा महंत अवैद्यनाथ यांना भेटले. आठवडाभर गोरखपूरला मुक्काम केला. ते परतत असताना महंत म्हणाले, गोरखधाम मंदिरात पूर्णवेळ शिष्य म्हणून सामील व्हा. मनात हजारो प्रश्न घेऊन तेव्हा अजय सिंह काहीच न बोलता परत गेले.
एम्समध्ये दाखल झाल्यावर महंतांनी टाकला दबाव
महंत अवैद्यनाथ जुलै 1993 मध्ये आजारी पडले. त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. अजय सिंहांना माहिती मिळताच तेही त्यांना पाहण्यासाठी दिल्लीला पोहोचले. यावेळी महंतांनी अजय सिंहांवर दबाव टाकला. म्हणाले, ‘मला बरे वाटत नाही. मला योग्य शिष्य हवा आहे. ज्यांना मी माझा उत्तराधिकारी म्हणून घोषित करू शकेन. मी हे करू शकलो नाही तर हिंदू समाज मला चुकीचे समजेल.”
न सांगताच घरातून निघून गेले अजय सिंह बिष्ट
नोव्हेंबर 1993 मध्ये अजय सिंह बिष्ट घरी कोणालाही न सांगता गोरखपूरला आले. दुसरीकडे घरातील लोक नाराज होते, इकडे अजय सिंहांची कठोर तपश्चर्या सुरू झाली होती. 15 फेब्रुवारी 1994 रोजी बसंत पंचमीच्या दिवशी महंत अवैद्यनाथ यांनी अजय सिंह बिष्ट यांना दीक्षा दिली. गोरखनाथ मठाचे उत्तराधिकारी घोषित केले. त्याच 15 फेब्रुवारीपासून अजय सिंह बिश्ट यांचे नाव बदलून योगी आदित्यनाथ करण्यात आले.
12 सप्टेंबर 2014 रोजी महंत अवैद्यनाथ यांच्या निधनानंतर पारंपरिक समारंभानंतर योगी आदित्यनाथ यांना गोरखनाथ मंदिराचे पीठाधीश (मुख्य पुजारी) म्हणून घोषित करण्यात आले.
अजय बिश्टचे योगी आदित्यनाथ झाल्यानंतर त्यांनी मठाची जबाबदारी स्वीकारली. संन्यासानंतर चार वर्षांनी त्यांनी राजकीय जबाबदारीही स्वीकारली आणि 1998 मध्ये पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली.
सलग पाचवेळा खासदार झाले
1998 मध्ये ते पहिल्यांदा गोरखपूरमधून खासदार झाले. 1999 मध्ये पुन्हा निवडणूक झाली तेव्हा ते पुन्हा विजयी झाले. 2002 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी हिंदू युवा वाहिनी नावाची संघटना स्थापन केली. या संघटनेचा संपूर्ण राज्यात विस्तार केला. 2004 मध्ये तिसर्यांदा, 2009 मध्ये चौथ्यांदा आणि 2014 मध्ये पाचव्यांदा योगी याच गोरखपूर मतदारसंघातून खासदार झाले.
2017 मध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्यावर पक्षाने योगी आदित्यनाथ यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मुख्यमंत्री केले. योगींनी लोकसभेचा राजीनामा देऊन विधान परिषदेचे सदस्यत्व घेतले. 2022 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी यूपीमध्ये पुन्हा कमळ फुलवले आणि यूपीच्या सत्तेच्या शिखरावर विराजमान झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App