Hanging bridge collapses in Karimganj Assam : आसाममध्ये पूल कोसळून 30 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना आसामच्या करीमगंज जिल्ह्यातील आहे. तेथे हँगिंग ब्रीज पूल कोसळून सुमारे 30 विद्यार्थी जखमी झाले. असे सांगितले जात आहे की, हे सर्व विद्यार्थी शाळेतून घरी परतत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना सोमवारी करीमगंज जिल्ह्यातील रटाबारी विधानसभा मतदारसंघाच्या चेरागी भागात घडली. Hanging bridge collapses in Karimganj Assam 30 students injured
वृत्तसंस्था
करीमगंज : आसाममध्ये पूल कोसळून 30 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना आसामच्या करीमगंज जिल्ह्यातील आहे. तेथे हँगिंग ब्रीज पूल कोसळून सुमारे 30 विद्यार्थी जखमी झाले. असे सांगितले जात आहे की, हे सर्व विद्यार्थी शाळेतून घरी परतत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना सोमवारी करीमगंज जिल्ह्यातील रटाबारी विधानसभा मतदारसंघाच्या चेरागी भागात घडली.
हँगिंग ब्रीज कोसळल्याने विद्यार्थी शाळेतून घरी परतत होते. आसाममधील सिंगला नदीवर बांधलेला हा झुलता पूल हा चेरगी परिसराला गावाशी जोडणारा एकमेव पूल आहे. गेली अनेक वर्षे विद्यार्थी आणि स्थानिक लोक या पुलाचा वापर इतर ठिकाणी पोहोचण्यासाठी करतात.
सोमवारी, जेव्हा चेरागी विद्यापीठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या पुलाच्या मदतीने सिंगला नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हँगिंग ब्रीज अचानक कोसळला. यामुळे विद्यार्थी नदीत पडले. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिकांनी विद्यार्थ्यांना वेळीच नदीतून बाहेर काढले. या घटनेत 30 विद्यार्थी जखमी झाले आहेत.
जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा झुलता पूल केवळ तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
Hanging bridge collapses in Karimganj Assam 30 students injured
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App