प्रतिनिधी
नवी दिल्ली : इतिहासात प्रथमच महिला ‘महरम’ अर्थात पती किंवा पुरुषाशिवाय एकट्या हज यात्रेला जात आहेत. एकट्याने हज यात्रेला जाणाऱ्या देशभरातील महिलांचा आकडा 4000 वर पोहोचला आहे. यात दिल्लीतील 39 महिलांचा समावेश आहे. अशा प्रकारे क्रांतिकारी बदल करून प्रवासाला पाठवल्याबद्दल या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. Haj Yatra 2023 Delhi Airport Update
दिल्ली विमानतळावरून 39 महिला हज यात्रेसाठी रवाना झाला. केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी या बॅचला हिरवी झेंडी दाखवली. यावेळी मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, मोदी सरकारच्या कार्यकाळात महिला स्वावलंबी होत आहेत. त्यामुळेच आज त्या मरहम शिवाय एकट्याच हज यात्रेला जात आहेत.
महिलांच्या या प्रवासाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सौदी एअरलाइन्सनेही हज यात्रेची प्रक्रिया प्रथमच एवढ्या चांगल्या पद्धतीने केली जात असल्याचा दावा केला आहे.
या महिलांना हज यात्रेसाठी फिटनेसचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. यामुळे त्यांना तिथे वावरण्यात कोणतीही अडचण येणार नाही. याशिवाय सौदीमध्ये त्यांच्या मुक्कामाची विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रवासात कुणाची प्रकृती बिघडली, तर त्यांच्यासाठी वैद्यकीय सुविधांवरही पूर्ण लक्ष दिले जाईल, अशी माहिती मीनाक्षी लेखी यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App