ज्ञानवापी मशिदीमध्ये भव्य शिवलिंग सापडले..? वाराणसी कोर्टाकडून जागा सील बंद करण्याचे आदेश

वृत्तसंस्था

वाराणसी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. हे सर्वेक्षण सलग तीन दिवस सुरु होता. या सर्वेतून काही महत्त्वाची निरीक्षणे समोर आल्याचे समजत आहे. सोमवारी सर्वे करणाऱ्या टीमने नंदीसमोरच्या  विहिरीचे देखील सर्वेक्षण केले.  या सर्व्हेत विहिरीमध्ये शिवलिंग सापडल्याचे नमूद केले आहे. सर्वेक्षणात सापडलेले अवशेष सुरक्षित ठेवण्यात यावेत या मागणीसाठी हिंदू पक्षांनी कोर्टात अर्ज केला त्याबरोबर कोर्टाने संबंधित सर्वेक्षित जागा सील करण्याचे ताबडतोब आदेश दिले आहेत. प्रशासनाने कोर्टाच्या आदेशानुसार ज्ञानवापी परिसरातील सर्वेक्षित जागा सील केली आहे.. Gyanvapi Masjid: Hindu party in court for protection of remains found in survey !!

सुरुवातीला मुस्लिम पक्षाने विरोध केलेले ज्ञानवापी मशिद परिसराचे सर्वेक्षण चोख सुरक्षा व्यवस्थेत पार पडले. इतकेच नव्हे तर सर्वेक्षणादरम्यान तब्बल दोन किलोमीटरचा परिसर बंद करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणावर या परिसरात फौज तैनात करण्यात आली होती.

– भिंतीवरचा चुना काढून सर्वेक्षण

ज्ञानवापी मशिदीत सलग तीन दिवस सर्वेक्षण सुरु होते. या दरम्यान भिंतीवरचा चुना काढून सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान रविवारी मशिदीचा पश्चिम दरवाजा, नमाज  पठण करण्याची जागा, वजू करण्याची जागा तसंच मशिदीच्या तळघराचे देखील सर्वेक्षण करण्यात आले.



 

चोख सुरक्षा व्यवस्था

सर्वेक्षणाच्या दरम्यान चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. गोदौलिया ते मैदागिनपर्यंत सगळी दुकाने बंद करण्यात आली होती. त्याच बरोबर दोन किलोमीटरच्या परिसराला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. कालच्या तुलनेत आज जास्त फौजफाटा तैनात करण्यात आला होता. परिसरात युपी पोलीस आणि सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते.

मुस्लिम पक्षाने फेटाळला हिंदू पक्षाचा दावा 

सोमवारी हिंदू पक्षाच्या वतीने दावा करण्यात आला आहे की, मशिदीच्या विहिरीत शिवलिंग सापडलं. मात्र हा दावा मुस्लिम पक्षाने फेटाळून लावला आहे. विहिरीत शिवलिंग सापडले नसल्याचा मुस्लिम पक्षाचा दावा आहे. मात्र, संबंधित सर्वेक्षित जागा सील झाल्याने याचा निकाल कोर्टच घेणार आहे.

कोर्टात सादर होणार अहवाल

कोर्टाने नियुक्त केलेल्या टीमद्वारे सलग तीन दिवसांचा सर्वेक्षणाअंतर्गत एक रिपोर्ट 17 मे रोजी कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले होते.  त्या अनुषंगाने कोर्टात रिपोर्ट सादर होणार आहे.

Gyanvapi Masjid: Hindu party in court for protection of remains found in survey !!

महत्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात