Gyanvapi case : अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत निर्णय राखून ठेवला!


 ASI सर्वेक्षणावरील  तोपर्यंत  स्थगिती कायम राहणार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :. ज्ञानवापी संकुलाचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) सर्वेक्षण करून घेण्याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयात गुरुवारीही सुनावणी झाली. दरम्यान, उच्च न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत निकाल राखून ठेवला असून तोपर्यंत ASI सर्वेक्षणावरील स्थगिती कायम राहणार आहे. मुस्लीम पक्षाने ASI सर्वेक्षणाला विरोध केला आहे. याबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. Gyanvapi case Allahabad High Court reserved the decision till August 3

रामजन्मभूमीचा आधारही ASI सर्वेक्षण बनले होते. यापूर्वी ज्ञानवापी प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मुस्लीम पक्ष सुप्रीम कोर्टात गेला होता. 26 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ज्ञानवापी संकुलाचे ASI सर्वेक्षण होणार नाही, दरम्यान मशीद समिती उच्च न्यायालयात जाईल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

वाराणसी न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने २१ जुलै रोजी ज्ञानवापी कॅम्पसमधील वजूखाना वगळता उर्वरित भागांची वैज्ञानिक तपासणी करण्याचे आदेश दिले होते. तसेच, अहवाल तयार करून 4 ऑगस्टपर्यंत द्या आणि मंदिर तोडून वर मशीद बांधली आहे का ते सांगा? असे निर्देश दिले होते.

Gyanvapi case Allahabad High Court reserved the decision till August 3

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात