विशेष प्रतिनिधी
अलाहाबाद : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने अंजुमन इंतेजामिया मशीद समिती आणि वादाशी संबंधित इतर पाच याचिकांवर मोठा निकाल दिला. यावेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या.Gyanvapi Case All petitions of Muslim side rejected in Allahabad HC orders to complete hearing in 6 months
या प्रकरणात उच्च न्यायालयाने १९९१ खटल्याच्या सुनावणीस मान्यता दिली. यासोबतच वाराणसी कोर्टाला ६ महिन्यांत सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
या निर्णयामुळे मुस्लिम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अलाहाबाद हायकोर्टाने ज्या पाच याचिकांवर निकाल दिला, त्यापैकी तीन याचिका वाराणसी कोर्टात १९९१ मध्ये दाखल झालेल्या खटल्याच्या योग्यतेशी संबंधित आहेत, तर उर्वरित दोन याचिका या सर्वेक्षणाविरोधात दिलेल्या आव्हान याचिका आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App