विशेष प्रतिनिधी
चंडीगड : मिशन पंजाब नावाची एक कल्पना मी मांडली होती. एखादी कल्पना मांडण्यापासून किंवा विचार व्यक्त करण्यापासून कुणीही कुणालाही रोखू शकत नाही. याबाबत कुणाचेही दुमत असू शकत नाही, असे स्पष्ट करीत शेतकरी नेते गुरनामसिंग चढूनी यांनी आपले निलंबन चुकीचे असल्याचा दावा केला.Gurunam will say again about mission punjab
निलंबनानंतरही आंदोलन कमकुवत होऊ दिले जाणार नाही. आणखी ताकदीनिशी त्यात भाग घेऊ असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, वरिष्ठ शेतकरी नेते डॉ. दर्शन पाल यांनी सांगितले की, चढूनी यांनी जे वक्तव्य केले त्यावरून शेतकरी आणि कामगारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो.
याबद्दल सखोल चर्चा झाली. लोक त्यांच्या वक्तव्याबाबत नाराज आहेत. सध्या सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान आमच्याबाजूने कोणत्याही प्रकारे मार्ग भरकटता कामा नये किंवा ते तीव्रता कमी होता कामा नये. संघर्ष भाजप आणि मित्र पक्षांना विरोध यावरच आमचे लक्ष असले पाहिजे.
संयुक्त किसान मोर्चासमोर आपली ही भूमिका मांडल्याचे चढूनी यांनी सांगितले. शेतकरी आणि कामगारांनी निवडणूका लढवाव्यात या आपल्या विचारसरणीशी ठाम असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App