विशेष प्रतिनिधी
तापी (गुजरात) : गुजरातच्या तापी जिल्ह्यातून अत्यंत भयावह अशी घटना समोर आली आहे. तापी जिल्ह्यातील सोनगढ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या FIR नुसार, एका चर्चचा पाद्री हा अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा बळी बनवायचा. एवढंच नव्हे तर त्याच्या अत्यंत घृणास्पद कृत्यात त्याची पत्नी देखील त्याला साथ द्यायची. पती जेव्हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायचा तेव्हा पत्नी पतीचे हे कृत्य मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायची. आता पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे. तसेच आरोपीने याआधीही आणखी कुणावर अशा प्रकारे अत्याचार केले आहेत का? याचीही पोलीस चौकशी करत आहेत.
दक्षिण गुजरातमधील आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या तापी जिल्ह्यातील सोनगड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव बळीराम कोकणी असे आहे. तर त्याच्या पत्नीचं नाव अनिता कोकणी असे असून तिला देखील अटक करण्यात आली आहे. हे दोघेही पती-पत्नी असून बळीराम कोकणी हा सोनगढ परिसरात असलेल्या एका चर्चचा पाद्री आहे.
सोनगड पोलिसांनी पाद्री बळीराम कोकणी याला 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. तर त्याची पत्नी अनिता हिला या कामात पतीला सात दिल्याप्रकरणी आणि पीडितेचा व्हिडिओ शूट करुन तिला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
तापी जिल्हा पोलीस डीव्हायएसपी आरएल मावाणी यांनी सांगितले की, पाद्री बळीराम कोकणी यांच्या वासनेची शिकार झालेली अल्पवयीन मुलगी तिच्या आई-वडिलांसह आजीच्या शेतात आणि चर्चमध्येही जात असे. एके दिवशी पीडित मुलगी ही बळीराम कोकणी यांच्या शेतात मजुरीसाठी गेली होती तेव्हा आरोपी बळीरामाने तिच्यावर बलात्कार केला.
जेव्हा पाद्री बळीराम कोकणी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होता तेव्हा त्याची पत्नी अनिताही त्या ठिकाणी हजर होती. एवढंच नव्हे तर तिने तिच्या मोबाइलमध्ये बलात्कारी पती आणि पीडितेचे फोटोही काढले. याशिवाय त्यांचे काही व्हीडिओ देखील शूट केले. याच आधारे पीडितीला ब्लॅकमेल करुन पाद्री बळीराम कोकणी याने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तब्बल तीन वेळा बलात्कार केला. या सगळ्यातही अनिताने आपल्या पतीला मदत केली. अखेर हा प्रकार सहन न झाल्याने पीडितीने या प्रकाराबाबत आपल्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली. ज्यानंतर पाद्रीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. ज्यानंतर बलात्कारी बळीराम आणि या कामात त्याला मदत करणारी त्याची पत्नी अनिता यांनाही अटक करण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App