विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणूक 2022 चे निकाल लागले आहेत. भाजपने आधी म्हटल्याप्रमाणे नरेंद्र का रेकॉर्ड भूपेंद्र तोडेगा असे घडले आहेच. पण त्यापुढे जाऊन काँग्रेसच्या माधव सिंह सोलंकी यांचे 149 जागांचे रेकॉर्ड देखील भाजपने तोडले आहे. या विषयाची जोरदार चर्चा मेन स्ट्रीम मीडियाबरोबर सोशल मीडियातही आहे. पण यातून एक मुद्दा निसटतो आहे, तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय मॉडेल फॉलो करत आहेत का??, असा प्रश्न तयार झाला आहे. Gujrat Elections 2022 : Is Modi following Mamata model to make Congress politically zero sum??
2021 एप्रिल मधली पश्चिम बंगालची निवडणूक आठवा म्हणजे शीर्षकात विचारलेल्या प्रश्नाचा नेमका अर्थ कळेल. 2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी नेमके कोणते मॉडेल वापरले होते?, त्या भाजप विरुद्ध जोरदार तोफा डागत होत्या. प्रत्येक भाषणात मोदींना जोरदार आव्हान देत होत्या. पण राजकीय कृती मात्र त्या काँग्रेस फोडण्याची करत होत्या. भाजप विरोधात मोठे राजकीय अकांड तांडव करून प्रत्यक्षात त्यांनी काँग्रेसची अक्षरशः शकले केली होती आणि त्याचे परिणाम पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालात दिसले. भाजप तिथे 77 जागा जिंकून विरोधी पक्ष झाला. ममता बॅनर्जींनी स्वतःचेच रेकॉर्ड तोडून 219 जागा जिंकल्या. पण काँग्रेस आणि डावे पक्ष यांचा पुरता सुपडा साफ झाला. पश्चिम बंगाल विधानसभेत काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा एकही आमदार उरला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालचे हेच मॉडेल गुजरात मध्ये आणू पाहत आहेत का ? हा प्रश्न विधानसभेच्या गुजरात विधानसभेच्या 2022 च्या आजच्या निकालावरून संयुक्तिक वाटतो आहे. भाजपला गुजरात मध्ये तब्बल 54 % मते मिळाली आहेत. म्हणजे भाजपची खरी लढत स्वतःचे रेकॉर्ड तोडण्याची आणि रेस अगेन्स्ट इट्सेल्फ अशीच होती. ती बाकी कोणत्याही पक्षाविरुद्ध नव्हती. मोदींनी ते मुख्यमंत्री असताना 127 जागा जिंकून दाखवल्या होत्या. ते रेकॉर्ड पक्षाला तोडायचे होते.
पण काँग्रेसने त्यांना रावण, औकात दाखवू अशा शब्दांनी आव्हान दिले आणि तिथे निवडणूक फिरली. 2007 ची निवडणूक मौत का सौदागर या आरोपामुळे फिरली होती. 2017 ची निवडणूक नीच या शब्दामुळे फिरली होती आणि 2022 मध्ये काँग्रेसनेच रावण आणि औकात दाखवू या दोन शब्दांमुळे ही निवडणूक फिरवून दाखवली. काँग्रेस तिथे नापास झाली आहे. 2017 च्या निवडणुकीत 77 जागा घेऊन डिस्टिंक्शन मिळवणारी काँग्रेस आता 20 जागा मिळवण्यासाठी धडपडते आहे.
याचा नेमका राजकीय अर्थ असा की, काँग्रेसची मते आम आदमी पार्टी आणि असदुद्दीन ओवैसी यांनी फोडलेली असोत अथवा भाजपने मतांच्या टक्केवारीची पन्नाशी ओलांडली असो, काँग्रेस मत टक्केवारी देखील निम्म्याने घसरली आहे. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसला 41 % मते होती 2022 च्या निवडणुकीत 21 % मते मिळाली आहेत. पश्चिम बंगालमध्ये जशी काँग्रेसची भाजपच्या शून्यवत अवस्था झाली त्या शून्यवत अवस्थेकडे गुजरात मध्ये काँग्रेस चालली आहे. मोदींनी भाजपच्या मतांची टक्केवारी वाढवून एक प्रकारे ममता मॉडेल फॉलो करून काँग्रेसला गुजरातमध्ये पश्चिम बंगाल सारखेच शून्यवत करत आहेत. ममतांची पॉलिटिकल स्टाईल थोडी वेगळी होती. मोदींची पॉलिटिकल स्टाईल वेगळी आहे पण राजकीय ध्येय मात्र काँग्रेस शून्यवत करणे असे कॉमन आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App