वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा यांच्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सिरीयस मोडमध्ये आली आहे. नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीसंदर्भात मीडियामध्ये काँग्रेस अध्यक्षांच्या निवडणूक केंद्रित बातम्या आल्या. त्यावर टीका टिपण्या झाल्या. परंतु काँग्रेस हायकमांड मात्र या बातम्यांमध्ये न गुंतता आणि विचलित न होता वेगळ्या मार्गाने निघाल्याचे दिसत आहे. Gujarat Congress leaders meet party leader Rahul Gandhi in Delhi ahead of selection of Gujarat PCC chief
काँग्रेसने कार्यकारिणीच्या बैठकीत ठरवल्याप्रमाणे सदस्यता अभियान आणि कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण यावर काँग्रेस हायकमांडने भर दिला आहे. या दोन मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीसांची आणि निवडणुका असलेल्या राज्यांच्या प्रभारी नेत्यांची महत्त्वाची बैठक येत्या 26 ऑक्टोबरला दिल्लीत दिवसभर होत आहे. सदस्यता अभियान विस्तार आणि कार्यकर्ता प्रशिक्षण या दोनच अजेंड्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
A meeting of Congress general secretaries and state incharges to be held on 26th October at AICC headquarters in Delhi to discuss strategy for the upcoming Assembly elections and to hold discussions on membership and training. — ANI (@ANI) October 22, 2021
A meeting of Congress general secretaries and state incharges to be held on 26th October at AICC headquarters in Delhi to discuss strategy for the upcoming Assembly elections and to hold discussions on membership and training.
— ANI (@ANI) October 22, 2021
त्याचप्रमाणे काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आजच गुजरातच्या सर्व नेत्यांशी नवी दिल्लीत चर्चा केली आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेमणे बाकी आहे. हार्दिक पटेल यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षपद आहे. गुजरात मध्ये नोव्हेंबर 2022 नंतर निवडणूक आहे. परंतु पक्षाचे संघटन तिथे भाजप खालोखाल मजबूत आहे. पक्षाचे 2017 च्या निवडणुकीत 87 आमदार निवडून आले होते. या पैकी 80 आमदार काँग्रेसच्या छत्रछायेखाली अद्याप आहेत. संघटनात्मक पातळीवर देखील काँग्रेस भाजपशी मजबूत टक्कर घेण्याच्या स्थितीत आहे. पक्ष संघटनेची स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी राहुल गांधी यांनी गुजरातवर लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य म्हणून देखील गुजरातचे महत्त्व सर्वाधिक आहे तेथे जर काँग्रेसने भाजपवर मात करून दाखवली तर पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे मनोधैर्य इतके उंचावेल की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची नौका शंभर-दीडशेचा आकडा देखील काढू शकेल, असा काँग्रेस श्रेष्ठींचा होरा आहे.
Gujarat Congress leaders meet party leader Rahul Gandhi in Delhi ahead of selection of Gujarat PCC chief pic.twitter.com/CxtLzECd9l — ANI (@ANI) October 22, 2021
Gujarat Congress leaders meet party leader Rahul Gandhi in Delhi ahead of selection of Gujarat PCC chief pic.twitter.com/CxtLzECd9l
या पार्श्वभूमीवरच काँग्रेस हायकमांडवर मीडियात होणाऱ्या टीकाटिपण्यांकडे लक्ष न देता हायकमांडने पक्षसंघटना विस्तार, संघटक सदस्यता अभियान आणि कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण या तीन महत्त्वपूर्ण अजेंड्यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. म्हणूनच 26 तारखेची पक्षाच्या सरचिटणीसांची आणि राज्याच्या प्रभारी नेत्यांची बैठक अतिशय महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App