वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून ३१ अत्याधुनिक प्रिडेटर ड्रोन इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी किमतीत खरेदी करण्याचा करार केला आहे. अमेरिकेच्या जनरल ॲटॉमिक्स कंपनीकडून एमक्यू-९ बी ड्रोन खरेदी करणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मेक्सिको आणि युएइचा समावेश आहे.Great success in dealing cheaply with America; India will buy 31 Predator drones for 33 thousand crores
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ३१ ड्रोनसाठी ही डील ३३,१३४ कोटी आहे. (म्हणजे एकाची किंमत सुमारे १०६० कोटी). या करारात भारत दोन डझनहून अधिक संबंधित उपकरणेदेखील खरेदी करत आहे.
ऑस्ट्रेलिया, तैवान, जर्मनीकडेही हे ड्रोन आहेत
ऑस्ट्रेलियाने १२ ड्रोन आणि उपकरणांचा करार १३,७०० कोटींमध्ये (एकाची किंमत १०८० कोटी) केला. तैवानला ४ ड्रोन आणि उपकरण ४९८० रु. कोटीत विकले. यूएईने ४ वर्षाआधी हेच १८ ड्रोन, उपकरण २४ हजार कोटीत (१३३० कोटी रुपयात एक) घेतले होते. जर्मनीने सन २००८ मध्ये १६ वर्षांआधी ५ प्रिडेटर ड्रोनसाठी अमेरिकेला २० कोटी डॉलर (१६६० कोटी रुपये) दिले होते.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने भारतासोबतच्या कराराच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, दिलेले दर हे डॉलरचे जास्तीत जास्त मूल्य आणि प्रमाणानुसार आहेत. करार पूर्ण केला जाईल तेव्हा ही किंमत आणखी कमी होऊ शकते.करारात हेसुद्धा… ग्राउंड कंट्रोल स्टेशन, हेलफायर मिसाइल लाँचर, मित्र आणि शत्रू ओळखण्याची यंत्रणा आणि इतर उपकरणे.
भारताला ३३ हजार कोटींत ही उपकरणेही मिळतील
३१ एमक्यू-९बी स्काय गार्डियन एअरक्राफ्ट, १६१ नेव्हिगेशन सिस्टिम, ३५ कम्युनिकेशन्स इंटेलिजन्स सेन्सर सुट्स, १७१ एजीएम हेलफायर मिसाइल, १६ हेलफायर ट्रेनिंग मिसाइल, ३१० जीबीयू लेझर छोट्या व्यासाचे बॉम्ब, ८ गायडेड टेस्ट व्हेइकल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App