वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये भारतीय कलाकारांचा मोठा सन्मान झाला आहे. हा जगातील सर्वात प्रतिष्ठित संगीत पुरस्कार असल्याचे म्हटले जाते. भारतीय फ्यूजन बँड ‘शक्ती’ला ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम’ पुरस्कार मिळाला आहे. या बँडमध्ये शंकर महादेवन, जॉन मॅक्लॉफलिन, झाकीर हुसेन, व्ही. सेल्वागणेश आणि गणेश राजगोपालन यांसारखे प्रतिभावान कलाकार आहेत.Grammy Awards 2024 Indian music icon Danka, fusion band Shakti and flutist Rakesh Chaurasia honored
या बँडशिवाय बासरीवादक राकेश चौरसिया यांनाही ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. क्रिप्टो डॉट कॉम अरेना, लॉस एंजेलिस येथे सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी हा सोहळा पार पडला.
‘शक्ति’ला त्यांच्या लेटेस्ट म्युझिक अल्बम ‘धिस मोमेंट’साठी 66व्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम’ श्रेणीत विजेते म्हणून घोषित करण्यात आले. बँडने 45 वर्षांनंतर आपला पहिला अल्बम रिलीज केला, ज्याला थेट ग्रॅमी पुरस्कार मिळाला.
2022 च्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्येही भारताला दोन विजय मिळाले होते. पी.ए. दीपक, रिकी केज आणि स्टीवर्ट कोपलँड यांच्या ‘डिव्हाईन टाइड्स’ने ‘सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम’ श्रेणीत पुरस्कार जिंकला होता. भारतीय-अमेरिकन गायक फालूच्या ‘अ कलरफुल वर्ल्ड’ या अल्बमला ‘बेस्ट चिल्ड्रन्स अल्बम’ श्रेणीत ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता.
भारताचे प्रसिद्ध सितार वादक आणि संगीतकार, दिवंगत पंडित रविशंकर यांनी 1968 मध्ये प्रथमच ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. पंडित रविशंकर यांच्यासह वेस्टर्न क्लासिकल म्युझिकचे कंडक्टर झुबिन मेहता यांनीदेखील भारतासाठी 5 वेळा ग्रॅमी जिंकली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App