विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना संसर्गासाठीच्या लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना तिसरा बूस्टर डोस देण्याबाबत अद्याप विचार करण्यात आला नसल्याचे निती आयोगाने स्पष्ट केले आहे. सध्या तरी जास्तीत जास्त लसीकरणावर सरकारचा भर आहे. तसेच बूस्टर डोसबाबत तज्ज्ञ समितीने अद्याप प्रस्ताव किंवा शिफारस केलेली नाही, असेही आयोगाने म्हटले आहे. Govt. not think about booster dose for peopel
बूस्टर डोस कधी द्यायचा, याबाबत शास्त्रीय माहितीच्या आधारे संशोधन सुरू आहे. वेगवेगळ्या लशींचा प्रभाव वेगवेगळ्या कालावधीसाठी टिकू शकतो, त्याबाबत संशोधन सुरू आहे, असे व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही अद्याप बूस्टर डोसबाबत शिफारस केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन निती आयोगाने आधीच उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी काही सूचना केल्या आहेत. ‘‘गंभीर आणि मध्यम लक्षणे असलेल्या सुमारे २० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल. एका दिवसात ४ ते ५ लाख जणांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवले पाहिजेत. यात व्हेंटिलेटरसह १.२ लाख आयसीयू बेड, ७ लाख नॉन-आयसीयू हॉस्पिटल बेड असावेत, ’’ अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App