विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली- केंद्र सरकारने पाम तेल, सोया तेल, सूर्यफूल तेल यासारख्या आयात होणाऱ्या खाद्य तेलावरील आधारभूत आयात शुल्कात कपात केली आहे. यामुळे तेलाची दरवाढ नियंत्रणात येईल, असे सरकारचे म्हणणे आहे.Govt. decreased import duty from Oil
आता पाम, सोया आणि सूर्यफुलाच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर २४.७५ टक्के शुल्क लागेल. तर रिफाईन्ड प्रकारावर ३३.७५ टक्के शुल्क लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रमी दरवाढ झाल्याने देशांतर्गत बाजारात खाद्यतेल कडाडले आहे. भारतात जवळपास ६० टक्के खाद्यतेल आयात केले जाते.
मात्र वर्षभरात या तेलांच्या किमतीमध्ये सुमारे ६४ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली आहे. अनेक देशांनी जैवइंधनावर भर दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ झाली आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत खाद्यतेलाचे दर वाढण्यात झाला आहे.
पाम तेलावरील आयात शुल्क आता १० टक्क्यांवरून अडीच टक्क्यांवर आणले आहे तर सोया तेल आणि सूर्यफूल तेलावरचे आयुक्त शुल्क हे ७.५ टक्क्यांवरून अडीच टक्क्यांवर आणल्याचे परिपत्रक अर्थमंत्रालयाने रात्री जारी केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App